vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर येत्या सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा साजरा होणार..

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर येत्या सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा साजरा होणार..

राज्य प्रतिनिधी-तुळजापुरात कोजागिरी पौर्णिमा दोन दिवस-भाविकांचा ओघ वाढला; तुळजापूर-सोलापूर रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर येत्या सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा साजरा होणार आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर-तुळजापूर-सोलापूर हा नेहमीचा ४५ कि.मी.चा रस्ता सर्वच वाहनांच्या वाहतुकीसाठी शनिवारी (४ ऑक्टोबर) दुपारी ४ | वाजल्यापासूनच प्रशासनाने बंद केला आहे.

दरम्यान, दोन पौर्णिमेच्या धर्तीवर तुळजापुरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सर्वच यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. नवरात्र उत्सवात पाऊस, पूर होताच. आता कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा तरी उत्साहात व जल्लोषात साजरा व्हावा, यासाठी सर्वजण मातेची प्रार्थना करत आहेत. लाखो श्रद्धाळू तुळजापूरवारी पूर्ण करण्यासाठी शेकडो मैल अंतर अनवाणी पार करीत तुळजापूरच्या वाटेवर आहेत.

गुरुवारी सीमोल्लंघन सोहळ्यानंतर सुरू झालेली तुळजाभवानी मातेची पाच दिवसांची श्रम निद्रा मंगळवारी पहाटे (दि. ७) संपणार आहे. मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर चरणतीर्थ, काकडा आरती पार पडून मूर्तीला पहाटे आणि सकाळी असे दोनवेळा पंचामृत अभिषेक होणार आहेत.

संबंधित पोस्ट

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ शक्य; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिनही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही,पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत आपल्या संवेदनशील मनाची पुन्हा एकदा ओळख देत कबुतरांचे प्राण वाचवून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला.

vishwatmaklokswamivarta

रासायनिक गुलालांची विक्री, साठवणुक व वापरण्यास बंदी; जिल्हाधिकारी यांचे आदेश

ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सादर करण्याकरितावेळापत्रकात दि.15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न