vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

यंत्रमाग उद्योगांना वीज सवलत योजनेच्या लाभासाठीवस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर नोंदणी अनिवार्य..

यंत्रमाग उद्योगांना वीज सवलत योजनेच्या लाभासाठीवस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर नोंदणी अनिवार्य..

राज्य प्रतिनिधी-राज्यातील वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार यंत्रमाग उद्योगाला प्रोत्साहन मिळावे यासाठी वीज सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. ही सवलत मिळविण्यासाठी यंत्रमाग उद्योगाला वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ अंतर्गत ही सवलत मिळविण्यासाठी यंत्रमाग उद्योगांना सहा महिन्याच्या आत आयुक्तालयाच्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. अशी नोंदणी न केल्यास त्यांना वीज अनुदान सवलतीचा लाभ घेता येणार नाही.

याशिवाय आजच्या बैठकीत औद्योगिक समूह विकास योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील एक व धुळे जिल्ह्यातील एक अशा दोन खासगी सूतगिरण्यांना सहकारी सूत गिरण्यांप्रमाणेच प्रती युनिटमागे तीन रुपयांची अनुदान सवलत लागू करण्यास मान्यता देण्यात आली.

0000–

संबंधित पोस्ट

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य; नाणेघोळ येथील ६७ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर डोंगराला भेगा पडल्याचे निदर्शनास येताच प्रशासनाची तत्पर कार्यवाही..

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते कराड तालुक्यात शैक्षणिक प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन* 

बीड जिल्ह्यातील भूसंपादन मावेजा वाटपाच्या गैरव्यवहारातील  ७३ कोटींची रक्कम वसूल करणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

फळरोपवाटिकामधील कामासाठी निविदा प्रसिध्द

vishwatmaklokswamivarta

आगामी काळात ‘महाक्राईमओएस’ चा राज्यभर होणार वापर; २ कोटी रुपयांचा निधी मंजूर ‘एआय’ आधारित गुन्हे तपासाच्या प्रायोगिक प्रकल्पाला मिळाले आर्थिक बळ

२१ जुलै रोजी जालना येथे संविधानिक हक्कांसाठी मोर्चा; समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष गणेश चांदोडे यांचे आवाहन