vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगली पॅटर्न – सांगली जिल्ह्यातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम !!बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचेशनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन- जिल्हाधिकारी अशोक काकडे- कौशल्य विकासाद्वारे स्वयंरोजगारातून तिमिरातुनी तेजाकडे” 

सांगली पॅटर्न – सांगली जिल्ह्यातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम !!बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचेशनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन- जिल्हाधिकारी अशोक काकडे- कौशल्य विकासाद्वारे स्वयंरोजगारातून तिमिरातुनी तेजाकडे”

 सांगली, प्रतिनिधी : जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या सांगली येथील सर्व संस्थेच्या बालगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्वावलंबी होण्यासाठी, त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी अभिनव उपक्रम राबवित आहोत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून दिवाळीच्या सजावटीच्या वस्तू तयार करण्यात येत असून त्याचे प्रदर्शन शनिवार, दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे लावण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला सांगलीकरांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

  दिव्यांग विद्यार्थी व इतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिवाळीच्या सजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री ही जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सर्व सांगलीकरांसाठी सुरू राहील. या विद्यार्थ्यांनी कामकाजाला सुरुवात केली असून त्यांना आपल्या आधाराची व कौतुकाची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी कुटुंबासहित या प्रदर्शनास उपस्थित राहून, स्वतःच्या भविष्याच्या उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्या सांगलीमधील दिव्यांग व इतर विद्यार्थ्यांकडून दिवाळीचे साहित्य खरेदी करावे व त्यांना स्वयंरोजगाराच्या वाटेवर चालण्याचा आत्मविश्वास द्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण..

vishwatmaklokswamivarta

पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे तातडीने सुरू करा – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

प्रमुख प्रचारकांची संख्या आता २० ऐवजी ४०

vishwatmaklokswamivarta

गुणवत्तापूर्ण सुविधा पूर्ततेप्रमाणेच त्यासाठी कार्यरत कर्मचारीहिताय निर्णयावर आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचा भर दीड वर्षात 937 अधिकारी-कर्मचारी यांना पदोन्नती, आश्वासित प्रगती, अनुकंपा, लाड-पागे वारसा हक्क लाभ,प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी यांचेमध्ये समाधानाचे वातावरण

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरास वर्षभरात 15 दिवसांची विशेष परवानगी

vishwatmaklokswamivarta

प्रभू श्रीरामांनी सांगितलेल्या मूल्यांची जोपासना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…