vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बिहार निवडणूक आणि पोटनिवडणुका 2025: मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

बिहार निवडणूक आणि पोटनिवडणुका 2025: मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी..

राज्य प्रतिनिधी-.भारतीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीचा आणि 8 विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

2.बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 6 नोव्हेंबर 2025 (गुरुवार) आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 11 नोव्हेंबर 2025 (मंगळवार) या मतदानाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत तर सर्व 8 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकाही 11 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहेत.

3. लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या, कलम 135 ब नुसार, कोणत्याही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणत्याही आस्थापनेत काम करणाऱ्या आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी दिली जाईल.

4.अशाप्रकारे वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही. या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही मालकाला (नियोक्त्याला) दंड आकारला जाईल. सर्वकामगारांना त्यांचे दैनिक वेतन आणि अनियमित (कॅज्युअल) कामगारांना मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी मिळण्याचा अधिकार आहे.

5.जे मतदार (कॅज्युअल आणि दैनंदिन वेतन कामगारांसह) त्यांच्या मतदारसंघाबाहेरील औद्योगिक किंवा व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करतात किंवा नोकरी करतात परंतु मतदान होणाऱ्या मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणीकृत आहेत त्यांनाही मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टीचा लाभ मिळेल, जेणेकरून ते मतदान करू शकतील,असे आयोगाने पुढे स्पष्ट केले आहे.

6.आयोगाने सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांना या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी आणि सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार मुक्तपणे आणि सोयीस्करपणे वापरता येईल, याची खात्री करण्यासाठी आवश्यक सूचना जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित पोस्ट

आषाढी पालखी सोहळा-२०२६ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज- सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन २२ जून रोजी मुंबईत

पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा शिखर समिती बैठक; १७० कोटींच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला गती;जिल्ह्यात 423 तरुणांच्या उद्योगांना बँकेचे बळ

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ…