vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज गोवा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

आज गोवा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

राज्य प्रतिनिधी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. गोव्यामध्ये स्वदेशी विमानवाहक युद्धनौका आयएनएस विक्रांतवर ही दिवाळी साजरी केली गेली. या वेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरमधील तिन्ही सैन्यदलांच्या योगदानाचे कौतुक केले. तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारे वक्तव्य केले.

पंतप्रधान मोदींनी सैनिकांच्या कष्टांचे आणि बलिदानाचे महत्त्व सांगितले. या दिवाळीच्या दिवशी, एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला भारतीय सैनिकांची अनंत शक्ती पाहून मला अभिमान वाटतो. आपल्या जवानांच्या कष्टांमुळेच देश सुरक्षित आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये जवानांनी दाखवलेली देशभक्ती आणि उत्साह शब्दात व्यक्त करता येणार नाही. आयएनएस विक्रांत हे केवळ एक युद्धनौका नाही, तर भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण उद्योगाचे प्रतीक आहे. या युद्धनौकेच्या नावाने शत्रूंच्या मनातच भीती निर्माण होते. आयएनएस विक्रांतला फक्त युद्धसामर्थ्याने नव्हे तर भारताच्या परिश्रम, कौशल्य, प्रभाव आणि वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून पाहावे, असे त्यांनी म्हटले.भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये सातत्यपूर्ण प्रगती होत आहे.

संबंधित पोस्ट

नूतन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी कार्यभार स्वीकारला

मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मिरज शहरात कायमस्वरूपी सुधारित वाहतूक नियमन- फुलारी कॉर्नर ते दत्त चौक, दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगपालिकेची मालमत्ता कर वसुलीत ऐतिहासिक कामगिरी !आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ८७६ कोटींचा कर वसूल…

राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली; २०.५५ कोटींची तडजोड

भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 10व्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे उद्घाटन केले “आम्ही स्त्रीच्या डोळ्यातून एक अश्रू देखील पडू देऊ शकत नाही,” – गुरुदेव श्री श्री रविशंकर

vishwatmaklokswamivarta