vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

लॅटिन अमेरिकन वर्ड पोलीस फायर गेम साठी किशोर डांगे यांची निवड..

लॅटिन अमेरिकन वर्ड पोलीस फायर गेम साठी किशोर डांगे यांची निवड..

राज्य प्रतिनिधी

येत्या 26 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान लॅटिन अमेरिका मधील san luis potosi येथे पार पडणाऱ्या लॅटिन अमेरिकन वर्ड पोलीस अँड फायर गेम्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जालना येथील राज्य पोलीस दलातून जालना येथील किशोर ज्ञानेश्वर डांगे यांची निवड करण्यात आलेली आहे.

   या स्पर्धेत श्री किशोर डांगे हे शरीरसौष्ठव क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवणार असून, ते या स्पर्धेत सहभाग नोंदवणारे जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ठरले आहेत. या स्पर्धेत जालना जिल्ह्याच्या खेळाडूला स्थान मिळणे ही अभिमानाची बाब आहे.. भारतीय पोलीस संघाला लॅटिन अमेरिकन वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स साठी आमंत्रित करण्यात आलेले आहे व या संघात जालन्याचा होतकरू खेळाडू किशोर डांगे हे देखील सहभागी असणार आहे.. या स्पर्धेसाठी पोलीस दल आणि अग्निशामन विभागातील जगभरातून वेगवेगळ्या खेळासाठी अंदाजे 2500 खेळाडू सहभागी होणार आहेत.. श्री किशोर डांगे यांना या स्पर्धेसाठी निमंत्रित करणे ही बाब जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा मानल्या जात आहे… सर्व स्तरातून किशोर डांगे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे…

संबंधित पोस्ट

भारतीय क्रिकेट संघाचा न्युझीलंड क्रिकेट संघावर चित्तथरारक विजय,चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा दिमाखदार प्रवेश….

नवी मुंबई नमुंमपा चषक 40+ क्रिकेट स्पर्धेत गावकी विभागात दिवा कोळीवाडा 40+ संघशहरी विभागात युनायटेड स्पोर्टस, ऐरोली संघ विजयी

राज्यस्तरीय आदिवासी आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचे 5 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठीआज अंतिम मुदत इच्छुकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती क्रीडापीठाच्या आर्चरी प्रबोधिनीसाठी प्रवेश चाचणी ६ जुलैला;इच्छुक खेळाडूंना उपस्थित राहण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ यावर्षी ७ नाेव्हेंबर रोजी आयोजित

vishwatmaklokswamivarta