vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जालना येथे अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

जालना येथे अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

            जालना, प्रतिनिधी) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित युवा गटातील महिला-पुरूषासाठी निःशुल्क एक महिना कालावधीच्या अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जालना येथे करण्यात आले आहे. तरी पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन बार्टीचे प्रकल्प अधिकारी भाग्यश्री पाईकराव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उद्योजकीय प्रेरणा, उद्योजकीय गुणसंपदा, विविध संधी मार्गदर्शन, उद्योगाची निवड, उद्योगाचे व्यवस्थापन, उद्योगाला आवश्यक विविध परवाने, शासकीय व निमशासकीय विविध कर्ज योजना, खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, बँकेची कर्ज प्रक्रिया, उद्योगांना भेटी, सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण आदिबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. तसेच प्रशिक्षण पश्चात उद्योग सुरू करण्यासाठी हॅन्ड होल्डिंग सपोर्ट महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केला जाईल. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षणार्थी हा फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीकडे जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, आधार कार्डची छायांकित प्रत असणे गरजेचे असून उमेदवार हा 18 ते 50 या वयोगटातील असावा. इच्छुकांनी सदरील कार्यक्रमांच्या अधिक माहिती व प्रवेश अर्जाकरिता जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्डची छायांकित प्रत, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व पासपोर्ट साईज फोटोसह इच्छुकांनी प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी दि.5 नोव्हेंबर 2025 पुर्वी दिलीप शिलवंत कार्यक्रम आयोजक, मो.८०८७२८३०६५ किंवा प्रकल्प अधिकारी विनोद तुपे, एमसीईडी, जालना द्वारा-मराठा पार्क बिल्डिंग, विशाल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर चौफुली, जालना. फोन नं. ०२४८२-२२०५९२ येथे संपर्क साधावा. असेही कळविले आहे.

संबंधित पोस्ट

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण दि.१६ पासून

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी-कार्याचे स्मरण आवश्यक- श्रीमंत अमरजीत राजे बारगळ

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी17 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मुदत

vishwatmaklokswamivarta

कर्जत व जामखेड तालुक्यातील चार धार्मिक स्थळांना ‘ब’वर्गाचा दर्जा

ग्रामविकासासाठी लोकसहभाग व शाश्वत नियोजन आवश्यक– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- विकसित भारत – जी-राम-जी मिशनचा जिल्हास्तरीय शुभारंभ विविध विकासकामांचाही शुभारंभ

१५० दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स’ कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडून अभिनंदन २०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी

vishwatmaklokswamivarta