vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भारतीय महिला संघाने ICC विश्वचषक 2025 जिंकत रचला इतिहास. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव

भारतीय महिला संघाने ICC विश्वचषक 2025 जिंकत रचला इतिहास. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव..

खेळ प्रतिनिधी –

भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचला. डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत भारताने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. ४६.४ व्या षटकात, स्टार स्पिनर दीप्ती शर्माने डे क्लर्कला कर्णधार हरमनप्रीत कौरकरवी झेलबाद करताच भारताचा विजय निश्चित झाला. या क्षणी स्टेडियमवर भव्य आतषबाजी सुरू झाली आणि खेळाडूंनी मैदानावर आनंदोत्सव साजरा केला. डे क्लर्क १८ धावांवर बाद होताच, भारतीय खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला. हा विजय केवळ ११ खेळाडूंचा नसून, देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचे स्वप्न पूर्ण करणारा ठरला आहे. भारतीय महिला क्रिकेटने हे ऐतिहासिक विजेतेपद मिळवून नवा अध्याय लिहिला आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत सात बाद २९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावांवर गारद झाला. दीप्ती शर्माने पाच विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार एल वोल्वार्डची १०१ धावांची खेळी व्यर्थ गेली.

भारताने पहिल्यांदाच हा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला असून, महिला क्रिकेटला तब्बल २५ वर्षांनंतर नवा विश्वविजेता मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडनंतर महिला विश्वचषकाचा किताब जिंकणारी भारतीय संघ चौथी टीम बनली आहे.

भारतीय महिला संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ गडी गमावून २९८ धावांची मोठी धावसंख्या उभारली. नवी मुंबईत झालेल्या या सामन्यात भारताकडून शेफाली वर्माने सर्वाधिक ८७ धावांची, तर दीप्ती शर्माने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शेफालीने एकदिवसीय क्रिकेटमधील तिच्या सर्वोत्तम खेळीदरम्यान सात चौकार आणि दोन षटकार मारले. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने तीन, तर नोनकुलुलेको मलाबा, नाडिन डि क्लर्क आणि चोले ट्रॉयोन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिका संघाला धावांनी पराभूत करत विश्वचषकाचे जेतेपद जिंकले आहे. या जेतेपदासह भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे.नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेचा संघ लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वबाद २४६ धावांचा करू शकला. परिणामी भारताने सामना ५२ धावांनी जिंकला आणि ऐतिहासिक असे जेतेपद आपल्या नावे केले. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

भारतीय संघाने दिलेल्या २९९ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने दमदार सुरुवात केली होती. कर्णधार लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स या सलामीवीर जोडीने पहिल्या विकेट्ससाठी ५१ धावांची भागीदारी रचली होती. त्यानंतर ताजमिन ब्रिट्स 23 धावा करून बाद झाली. अमनजोर कौरने धावबाद केले. त्यानंतर मैदानात आलेली अॅनेके बॉश भोपळा ही न फोडता माघारी गेली. तिला श्री चरणीने बाद केले. सुन लुस आणि लॉरा वोल्वार्ड यांनी संघाला सावरले पण सून लुस ला शेफाली वर्मात्यानंतर मारिझान कॅप ४ धावा, सिनालो जाफ्ता १६ धावा, अनेरी डेर्कसेन ३५ धावा करून बाद झाली. या दरम्यान कर्णधार वोल्वार्डने एक बाजु सांभाळून धरली आणि शतक झळकवले. परंतु, ती १०१ धावा करून दिप्तीची शिकार ठरली. त्यानंतरक्लो ट्रायॉन ९ , नादिन डी क्लर्क १८, अयाबोंगा खाका 1 धावा करून बाद झाल्या तर नॉनकुलुलेको म्लाबा ० धावावर नाबाद राहिली. भारताकडून दिप्ती शर्माने 9.3 ओव्हरमध्ये ३९ धावा देत सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर शेफाली वर्माने २ विकेट्स घेतल्या आणि श्री चरणीने एक विकेट घेतलीने बाद केले.

भारताची प्लेइंग इलेव्हन-

शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन-लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), अनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा.

00000

संबंधित पोस्ट

विशेषलेख -कोकणातील साहित्यिक वाटचाल

vishwatmaklokswamivarta

वसई महापालिकेच्या हद्दीतील बर्डपार्क उभारण्याची कार्यवाही करावी – पालकमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरआज विराट जनआक्रोश मोर्चा जिल्हाभरातील भुमिहिन, बेघर, कास्तकर सहभागी होणार..

शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावे विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू करणार मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

यशेादा पॉलिटेक्निक कॉलेज सातारा येथे कायदेशीर जनजागृती कार्यक्रम संपन्न

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याकरिता 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार