vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास_*श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाकडून आयोजन*श्रीकृष्ण जन्मभूमी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी वैश्विक श्रीनारायण महायज्ञाचे वरळी, मुंबई येथे आयोजन* 

 – श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास_*श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाकडून आयोजन*श्रीकृष्ण जन्मभूमी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी वैश्विक श्रीनारायण महायज्ञाचे वरळी, मुंबई येथे आयोजन*

*मुंबई* प्रतिनिधी- श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी वैश्विक श्रीनारायण महायज्ञाचे वरळी, मुंबई येथे १५ आणि १६ नोव्हेंबर या दिवशी आयोजन केले आहे. जांभोरी मैदान, वरळी मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी श्रीनारायण महायज्ञाचे आयोजन होणार आहे ज्यामध्ये देशविदेशातून साधुसंत येणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी हिंदू संमेलन होणार आहे, अशी माहिती प्रेस क्लब, मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासचे राष्ट्रीय अध्यक्ष पूज्य श्री. दिनेश फलाहारी महाराजांनी दिली. यावेळी श्रीकृष्ण जन्मभूमि संघर्ष न्यासाचे राष्ट्रीय महामंत्री श्री.पराग फडणीस आणि राष्ट्रीय संघटन महामंत्री श्री. शंकर वराडकर उपस्थित होते.

श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाच्या वतीने पत्रकार परिषदेत वक्ते पुढे म्हणाले की, ‘मुघलांनी तलवारीच्या जोरावर या भूमीवर अनधिकृत ताबा मिळवला होता. परंतु आम्हाला सर्व सनातनींना श्रद्धा आहे आणि न्यायालयावर विश्वास आहे की न्यायालयाच्या सहकार्याने आणि आपल्या विचारांच्या आणि शब्दांची ताकद वापरून ही लढाई निश्चितच जिंकू. हा यज्ञ महाराष्ट्राच्या वीरभूमीवर होत आहे. आम्ही भगवान श्री विष्णूंच्या चरणी मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी लवकरच मुक्त होण्यासाठी प्रार्थना करत आहोत.’

 

सन १०१७ मध्ये महमूद गजनबी, १२५० मध्ये फिरोज तुगलक, १४९० मध्ये सिकंदर लोधी आणि १६७० मध्ये औरंगजेबने आपले कृष्ण मंदिर तोडले होते, परंतु हिंदू राजांनी कधीही आपले धैर्य सोडले नाही. मुघल शासक मंदिर तोडत राहिले आणि आपले हिंदू राजा मंदिर बनवत राहिले. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळामध्ये षडयंत्र करून न्यायालयामार्फत एक असा निकाल देण्यात आला की मंदिरच्या बाजूला जिथे मशीद आहे ती तशीच राहील, परंतु आम्ही याला न्यायालयात आव्हान दिले. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, प्राचीन तथ्यांना विचारात घेऊन न्यायालय हिंदू समाजाला न्याय देईल. भगवंताच्या कृपेने ज्या पद्धतीने अयोध्यामध्ये श्रीराम दरबार संपन्न झाला आहे त्याच प्रकारे मथुरेमध्येही भगवान श्रीकृष्णांìsचे भव्य आणि दिव्य मंदिर लवकरच बनेल !’, असे श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाच्या वतीने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पूज्य श्री दिनेश फलाहारी महाराज यांनी असा प्रण घेतला आहे की, जोपर्यंत श्रीकृष्ण जन्मभूमी अतिक्रमणमुक्त होत नाही तोपर्यंत ते अन्नप्राशन करणार नाहीत.. पराग फड़णीस राष्ट्रीय महश्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास

संबंधित पोस्ट

प्रशासनाच्या तत्पर मदतकार्यामुळे जिल्ह्यातील २२७ पूरग्रस्तांची सुटका पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मदतीसाठी प्रशासन तत्पर !

vishwatmaklokswamivarta

हिंदु संत आणि महिला यांच्यावर अश्लाघ्य टीका करणारे प्रा. श्याम मानव यांचा ‘बुवा तेथे बाया’ हा कार्यक्रम रद्द करा !* – हिंदु राष्ट्र समन्वय समितीची मागणी 

हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त भव्य नगर कीर्तन-सीबीडी बेलापूर ते ओवे मैदानापर्यंतचा परिसर भक्तीमय वातावरणात निघाला न्हावून,बोले सो निहाल’च्या जयघोषाने दुमदुमले खारघर…

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाजहितासाठी उद्योग क्षेत्राचे योगदान प्रेरणादायी

मॅजिक आयटीआय जालना इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना उद्योजक होण्याची संधी: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा  ‘मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर’ चे उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 28.15 टी.एम.सी. पाणीसाठा