vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर कालावधीत कुष्ठरुग्ण शोध अभियान

17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर कालावधीत कुष्ठरुग्ण शोध अभियान

        नवी मुंबई प्रतिनिधी-    समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण कमीत कमी कालावधीत जलद शोधून त्यांना उपचाराखाली आणणे व कुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2025 या कालावधीत “कुष्ठरुग्ण शोध अभियान” ही मोहीम नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे.

            ही मोहीम आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 182 पथकांच्या माध्यमातून 76,126 घरातील 3,41,339 लोकसंख्येला भेटी देण्यात येउुन नागरिकांची तपासणी व जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येक पथक दररोज 30 घरांना प्रभावीपणे भेट देऊन माहिती संकलीत करेल अशाप्रकारे पथके तयार करण्यात आली आहेत.

            प्रत्येक पथकामध्ये एक महिला व एक पुरुष कर्मचारी असणार आहे. प्रत्येक घरातील महिलांची तपासणी महिला कर्मचाऱ्यांमार्फत आणि पुरुषांची तपासणी पुरुष कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. कुष्ठरोगाकरिता त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे, जाड व बधीर तेलकट/चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद न करता न येणे अशा प्रकारची लक्षणे विचारुन तपासणी केली जाणार आहे. यामध्ये कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यानंतर वैदयकिय अधिकारी यांच्याकडे निदानाकरीता संदर्भित करण्यात येणार आहे.

            नमुंमपा कार्यक्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासणी कार्यक्षेत्राची निवड करण्यात आली असून यामध्ये झोपडपट्टी, बांधकाम मजूर, दगडखाणी इ. भागाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार 3,41,339 लोकसंख्येमध्ये 182 पथकांद्वारे मोहीम कालावधीत भेटी देण्यात येणार आहेत.

            या अभियानामुळे समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचारा‌द्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे हे उद्दीष्ट साध्य करण्यात येणार आहे.

            सदर मोहीमेमध्ये नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन स्वतःची कुष्ठरोगाबाबत तपासणी करुन घ्यावी व उद्दीष्ट साध्य करण्यात सहकार्य करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

विधानसभा प्रश्नोत्तर :’कर्करोग निदान व्हॅन’ ची स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून खरेदी- सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेची कटिबध्दता…गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेची कटिबध्दता…गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेची कटिबध्दता…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक दर्जाच्या दोन राष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य करार,आरोग्य क्षेत्रातील दर्जा व क्षमता वृद्धीसाठी पीएचएफआय, आयएमएमएएसटी यांच्यासोबत शासनाचा सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

विशेष वृत्त:प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यामाध्यमातून गर्भवती महिलांना मोठा दिलासा,जिल्ह्यात ३२ हजाराहून अधिक नवीन लाभार्थ्यांची नोंदणी

उन्हाळ्यात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सुचना जारी..

जागतिक सिकलसेल दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात “सिकलसेल जनजागृती पंधरवडा”दि. १५ ते ३० जून २०२५ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन