vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

संविधान दिनानिमित्त अंबरनाथ तालुक्यातील शासकीय कार्यालयांना संविधानाची प्रस्ताविका भेट

संविधान दिनानिमित्त अंबरनाथ तालुक्यातील शासकीय कार्यालयांना संविधानाची प्रस्ताविका भेट

 

ठाणे प्रतिनिधी : दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त अंबरनाथ तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांना सामाजिक कार्यकर्ते गौतम दाजीराम बचुटे यांनी संविधानाच्या उद्देशिकेच्या फ्रेम भेट म्हणून प्रदान केल्या

या उपक्रमात मा. न्यायाधीशिका जगताप मॅडम, हील लाईन पोलीस स्टेशन, उल्हासनगर येथील पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी मॅडम, बदलापूर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. हर्षदा पाटील, कुळगाव शहर पोलीस स्टेशन च्या पोलीस उपनिरीक्षक घारके मॅडम, श्री समर्थ विद्यालय, बदलापूरचे मुख्याध्यापक भीमराव ब्राह्मणे, तसेच कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेचे सामान्य प्रशासन अधिकारी सिद्धार्थ पवार सर यांचा समावेश होता.संविधान दिनानिमित्त घेतलेल्या या उपक्रमातून संविधानातील मूल्यांचा प्रसार, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि प्रत्येकाने संविधानातील तत्त्वांचा अंगीकार करण्याची प्रेरणा देणे हा हेतू होता

यावेळी मान्यवरांनी संविधानाचा आदर ठेवणे, नागरिक म्हणून कर्तव्यपालन करणे आणि आगामी पिढीपर्यंत लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. समाजासाठी अशी सकारात्मक उपक्रमशीलता प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संबंधित पोस्ट

देशभक्तीच्या प्रकाशात चमकला के.जे. सोमय्या महाविद्यालयाचा 66वा वर्धापनदिन..! जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा अखंड 30 वर्षांचा प्रेरणास्त्रोत’शहीद कॅप्टन विनायक गोरे’ एकपात्री लघुनाटिकेचा 5000 वा प्रयोग संपन्न..!

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या इस्रो अभ्यासदौऱ्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

गडचिरोलीतून 100 कोटींच्या निर्यातीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा**महानिर्यात-इग्नाईट कन्व्हेन्शन 2026 एक दिवसीय परिषद संपन्न*

vishwatmaklokswamivarta

मीरा-भाईंदर येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वन्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयीन नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न..

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘बहु-संस्थात्मक आपत्ती सज्जता सराव’ संपन्न-चक्रीवादळ आणि आपत्कालीन परिस्थितीचा यशस्वी मुकाबला*