vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

समाजकारण- राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली

समाजकारण- राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली

 

मुंबई, प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील समाजकारण- राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड गेल्याची शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण केली.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात,’सुराणा यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेचा वसा जपला. त्यांनी राजकीय क्षेत्रातही आदर्शवाद जोपासला. शेती, शेतकरी यांच्यासह पर्यावरण रक्षण, जलसंधारण यांच्यासाठी ते अखेरपर्यंत व्रतस्थपणे कार्यरत राहिले. नळदुर्ग येथील ‘आपलं घर’ बालगृह व शाळेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो अनाथ मुलांच्या आयुष्यात नवसंजीवनी आणली. त्यांची निस्पृह आणि आदर्श अशी जीवनशैली समाजकारण – राजकारणातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांचे निधन महाराष्ट्राच्या समाजकारण, राजकारण क्षेत्राची हानी आहे, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुराणा यांचे कुटुंबीय तसेच कार्यकर्ते यांच्याप्रती संवेदना व्यक्त करीत सर्वांच्या दुःखात सहभागी असल्याचे नमूद केले.

 

00000

संबंधित पोस्ट

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘महा इनविट’ संस्थेची स्थापना इनविट स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य..

सोमवारी शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन विमाशि संघाचे प्रलंबित समस्‍यांबाबत आंदोलन…

vishwatmaklokswamivarta

आजच्या या पावसाच्या दिवसात एअरटेलची सेवा ठप्प! नेटवर्क डाऊन, युझर्स फोन करुन कंटाळले

vishwatmaklokswamivarta

ग्रंथ पूजन करून ग्रंथोत्सव 2024 चे उद्घाटन संपन्न

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण· मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ‘आर्थिक आधार’…

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीमुळे रिपब्लिकन पक्षाचा 68 व्या वर्धापन दिनाचा दिनांक 3ऑक्टोबर चा कार्यक्रम रद्द -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन पक्षाचा यंदाचा 68 वा वर्धापन दिन आता दिनांक 3 नोव्हेंबर रोजी साजरा होणार*