vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करताना आचारसंहिता नियमांचे पालन करण्याचे आवाहन

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करताना आचारसंहिता नियमांचे पालन करण्याचे आवाहन

 सांगली, द प्रतिनिधी) : अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणिव, माहिती देण्यासाठी अल्पसंख्याक हक्क दिवसाच्या अनुषंगाने दि. 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास आचारसंहिता नियमांचे पालन करुनच उपस्थित राहावे, असे जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूक-2025 ची आदर्श आचारसंहिता लागू आहे. याबाबत निवडणूक आयोगाने दि. 4 नोव्हेंबर 2025 व दि. 15 डिसेंबर 2025 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे सदर आदेश विचारात घेऊन अल्पसंख्याक हक्क दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही. तसेच या कार्यक्रमास राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी/प्रतिनिधी उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी व आचारसंहिता नियमांचे पालन करुनच या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवारी फोस्टेक प्रशिक्षण;हॉटेल, केटरींग व्यवसाय चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सायन सर्कल येथे भीषण अपघात – सिमेंट मिक्सरची गाडी पलटी

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील 19 हजार शेतकऱ्यांना 142 कोटींची अधिकची कर्जमुक्ती; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून निधी जमा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

समूह साधन केंद्र समन्वयक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा संदर्भात शुद्धीपत्रक जारी…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ संपन्नसेवाभावनेने कार्य करणाऱ्या धर्मादाय संस्थांना शासनाचे सहकार्य राहील -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी घेतला कळमनुरी-वसमत उपविभागाचा आढावा