vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा 2025-26 चे अमरावती येथे आयोजन

राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा 2025-26 चे अमरावती येथे आयोजन

    अमरावती, प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १७ व १९ वर्ष मुले व मुलींची राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ चे आयोजन दि. १७ ते २० डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. गुरूवार, दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

  जिल्हा क्रीडा संकुलाच्या खेलो इंडिया आर्चरी आंतरराष्ट्रीय रेंजवर स्पर्धा होणार आहे. राज्यातील ८ महसूल विभाग आणि १ क्रीडा प्रबोधिनी, पुणे अशा एकूण ९ विभागांतील १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी सुमारे ४८५ खेळाडू, संघव्यवस्थापक, प्रशिक्षक आणि निवड समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत

    उद्घाटक कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, राज्य ऑलिम्पीक संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, राज्य धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर उपस्थित राहतील. उद्घाटन समारंभात आर्चरी खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू तुषार शेळके, मानव जाधव, कुमकुम मोहोड, यशदिप भोगे, मधुरा धामणगांवकर, पुर्वशा शेंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे     निवड समिती इंडियन, कंपाऊंड व रिकर्व्ह या क्रीडा प्रकाराचे निरीक्षण करून महाराष्ट्र राज्याच्या १७ व १९ वर्ष मुले व मुलींच्या संघाची निवड करतील. महाराष्ट्र राज्याचा संघ दि. २० डिसेंबर रोजी सायंकाळी घोषित करण्यात येणार आहे. निवड झालेल्या संघातील खेळाडू झारखंड व मणिपूर येथे होणाऱ्या ६९व्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करतील. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना आकर्षक मेडल्स व प्राविण्य प्रमाणपत्रे. तसेच सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धा सहभाग प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांना सूचना देण्याचे आवाहन

ठाणे येथील श्री माँ विद्यालयात ७ वी आंतरशालेय योग स्पर्धा संपन्न 

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या चुरशीच्या लढती

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात रेड रन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात सपन्न

क्रीडा शिष्यवृत्ती मिळणेकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta