vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खरीप हंगामात ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे आवाहन

खरीप हंगामात ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी: सातारा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम २०२५ मध्ये आपले 7/12 वरती पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी संबधीत गांवचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे दिनांक २४ डिसेंबर २०२५ पर्यंत पिकांची नोंद करणेकरिता अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसिलदार समीर यादव यांनी केले आहे

 राज्यात खरीप हंगाम, २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करणेबाबत दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयान्वये मंडल अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समीती गठीत केलेली असून सदर समीतीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व सहायक कृषी अधिकारी हे सदस्य असतील. सदर समितीने करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांनी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

 

0000

संबंधित पोस्ट

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करा – आमदार विलास तरे

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जिल्ह्यातील ११ गावांचा समावेश; १५ जून पासून जनजागृती

एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी व्यापक धोरण राबविणार – मंत्री आदिती तटकरे एकल महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

इंदोर महानगरपालिकेच्या अभ्यासगटाने नवी मुंबई शहराला भेट देत आधुनिकता व नाविन्यपूर्णतेची केली प्रशंसा

vishwatmaklokswamivarta

*नवी मुंबईत १६ व १७ मार्च रोजी राज्यस्तरीय ‘बाल मराठी संमेलन’चे भव्य आयोजन

महिला शेतकरी गटांना कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी अर्ज करण्यास 25 एप्रिलपर्यत मुदतवाढ