vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…

 

सांगली, प्रतिनिधी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरीता अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दि. 31 डिसेंबर 2025 अखेर पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याचे समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 26 डिसेंबर 2024 रोजीच्या च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची नव्याने अंमलबजावणी करण्यात येत असून योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईन पोर्टलव्दारे दि. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत स्वीकारण्यात आले होते. आता, विद्यार्थ्यांचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र, ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी इत्यादी कारणामुळे विविध विद्यार्थी संघटना, पालक, विद्यार्थी यांच्याकडून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील स्वाधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळण्याबाबत वरीष्ठ कार्यालयास मागणी केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगपालिका हद्दीतील व हद्दीपासनु 05 कि.मी. च्या परीसरातील तसेच तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयामधील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील इ. 11 वी, 12 वी तसेच इ.12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org किंवा MahaIT या पोर्टलवरती त्वरीत अर्ज भरावेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली कार्यालय, सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली व आपल्या तालुक्यातील गृहपाल, मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहामध्ये संपर्क साधावा, असे अवाहन सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या कामकाजाला गती देऊ — उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार

जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री भरत गोगावले पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ४२६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागातील-सहायक आयुक्त पदाच्या 311 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू· पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे ठोस निर्णय..

vishwatmaklokswamivarta

150 दिवसीय ई – गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड परिक्षेत्र अव्वल मा. मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा सन्मान 

26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील नव वर्ष स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेच्या चित्ररथास उत्स्फूर्त प्रतिसाद…