vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचाल एकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचाल

एकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी

 

शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची संपूर्ण प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी एकाच दिवशी श्रमदान कार्यक्रम राबवून 778 ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिली आहे.यामुळे ग्रामपंचायती जलसमृ़द्ध होण्यास मदत होणार असून त्यांची पाण्याची समस्या दूर होणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत हा विशेष उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारणे तसेच ग्रामीण भागात जलसंधारणास चालना देणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी, अधिकारी व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

यानिमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भासले, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी महाड व पोलादपूर तालुक्यात बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्याचप्रमाणे येथील विविध ग्रामपंचायतींना भेट देत समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या उपक्रमांचा आढावा घेउन ग्रामस्थांशी संवाद साधला.

मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) , सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची मुदत शासनाने वाढविली असल्याने रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी अशाच उत्स्फूर्तपणे व नियोजनबद्ध पद्धतीने उर्वरित कामे पूर्ण करावीत असे आवाहन केले

अलिबाग तालुक्यातील 62 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 62, कर्जत तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 55, खालापूर तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 44, महाड तालुक्यातील 134 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 83, माणगाव तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 57, म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 39, मुरुड तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 50, पनवेल तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 70, पेण तालुक्यातील 65 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 72, पोलादपूर तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 33, रोहा तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 61, श्रीवर्धन तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 39, सुधागड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 36, तळा तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 39, उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या 4, अशा एकूण 811 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 778 वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.

 

०००००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत

vishwatmaklokswamivarta

सांगलीत फटाके कारखान्यात भीषण स्फोट, पाच किमीपर्यंत हादरे, गाड्या आणि घराच्या काचा फुटल्या; दोघे गंभीर जखमी…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन पशुपालकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.. जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनात १६० पशुपक्ष्यांचा समावेश

vishwatmaklokswamivarta

नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही– मंत्री उदय सामंत

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा-माळीपुरा लवकरच सावित्रीबाई फुलेनगर या नावाने ओळखला जाईल-आ.खोतकर..

vishwatmaklokswamivarta

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस’च्या वतीने देण्यात आला पुरस्कार ,सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली  गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार प्रदान !