vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डावी लोकशाही आघाडीने जालना महानगर पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपला पाठींबा जाहीर

 डावी लोकशाही आघाडीने जालना महानगर पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपला पाठींबा जाहीर

राज्य प्रतिनिधी-डावी लोकशाही आघाडीने जालना महानगर पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपला पाठींबा जाहीर केला आहे सदरील पाठिंब्याचे पत्र कॉ.अण्णा सावंत,अफसर मिर्झा,नजीर पठाण यांनी आज काँग्रेस चे तालुका अध्यक्ष श्री कृष्णा पा.पडूळ यांना सुपूर्द केले.

        सदरील पत्रकात म्हंटले आहे कि, जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ ही अटीतटीची होत असून सदरील निवडणूक ही जालना शहराचा विकास व नागरी सुविधा या विषयावर व्हायला पाहिजे असे डावी लोकशाही आघाडीला वाटते. सदरील निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेना हे घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आहेत, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता असून सुद्धा त्यांनी जालना शहराच्या विकासाकडे व नागरी सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीने झोपडपट्टीवासियांना पी.आर.कार्ड देण्याचे व नागरी सुविधा देण्याचे आश्वासन दिले परंतु आजपर्यंत ते पूर्ण केलेले नाही व यापुढे ही भाजप व शिवसेना हे आश्वासन पूर्ण करणार नाही

        म्हणून डावी लोकशाही आघाडीतील घटक पक्ष, संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष,पीस फौंडेशन जालना, सामाजिक समता संघर्ष समिती यांनी ठरवलेले आहे कि, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या उमेदवारांचा पराभव करून महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (श.प.) च्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून जालनेकरांची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन डावी लोकशाही आघाडी तर्फे सर्व मतदारांना करण्यात येते.

       सदरील पाठिंबा पत्रावर कॉ. अण्णा सावंत,कॉ. देविदास जिगे, अॅड. शिवाजी आदमाने, अफसर मिर्झा, मारोती खंदारे, कृष्णा डवले, शेख मोईन, मधुकर मोकळे, प्रल्हाद पडूळ, अनिल मिसाळ, दिलीप साठे, आमेर शेख, एजाज शहा, मोहम्मद रियाज, बाबासाहेब पाटोळे, मिर्झा कैसर यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत.

-0000

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर, माथेरानमधील इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे · अटींचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

कर्तव्यपथावर महाराष्ट्र संस्कृतीचा जयघोष; ‘गणेशोत्सव’ चित्ररथाने वेधले जगाचे लक्ष ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा ‘अशोक चक्र’ने सन्मान

vishwatmaklokswamivarta

बाल शक्ती पुरस्कार; ऑनलाईन अर्ज आमंत्रित

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे वाहतूक व मालवाहतूक वेगवान होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी

अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावी राबवा-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

रक्षाबंधनानिमित्त रेल्वे डाक सेवा काउंटरवर रात्री उशिरापर्यंत बुकिंग सुविधा