vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा परिषद व पंचायत समितीनिवडणूक-2026 मतदानाच्या दिवशी आठवडा बाजारांना पूर्णवेळ बंदी..

जिल्हा परिषद व पंचायत समितीनिवडणूक-2026 मतदानाच्या दिवशी आठवडा बाजारांना पूर्णवेळ बंदी..

रायगड- प्रतिनिधी प्रतिनिधी:- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी आठवडा बाजारांना पूर्णवेळ बंदी घालण्यात आली असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी निर्गमित केले आहेत.

रायगड जिल्ह्यात शनिवार, दि.07 फेब्रुवारीला मतदान तर सोमवार, दि.9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणतीही अडचण न येता आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी, या उद्देशाने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी यांनी बाजार व जत्रा अधिनियम, 1862 चे कलम 5 (ग) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत शनिवार, दि.07 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस अधीक्षक रायगड यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघांमध्ये ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरतो, अशा सर्व ठिकाणी आठवडा बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशामुळे मतदान केंद्रांच्या परिसरात गर्दी टाळणे, वाहतुकीचा अडथळा कमी करणे आणि मतदारांना मतदानासाठी मोकळे व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

0000000

 

संबंधित पोस्ट

कवठेपिरानचा तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प पर्यावरणपूरक उपक्रम विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta

शेगाव तालुक्यातील केसगळती प्रकार रेशनच्या गव्हामुळे नाहीत– राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत माहिती दिली.

टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत आणखी सुधारणा..

vishwatmaklokswamivarta

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात ११३ गावांमध्ये शिबिरे*; *१६ ते ३० जूनदरम्यान लाभार्थ्यांना विविध सेवा*_जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मिरज तालुक्यातील 8 पाणंद, शिवरस्ते झाले अतिक्रमणमुक्त- 7.5 कि.मी. लांबीचे एकूण 8 रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याने 750 शेतकऱ्यांना मिळणार लाभ