vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून  -निसर्ग पर्यटनाधारित साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल..🌳 जिल्ह्यातील निसर्गप्रेमींमध्ये उत्साह; उपक्रमांना मोठा प्रतिसाद 

नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून  -निसर्ग पर्यटनाधारित साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल..🌳 जिल्ह्यातील निसर्गप्रेमींमध्ये उत्साह; उपक्रमांना मोठा प्रतिसाद

 

राज्य प्रतिनिधी `अकोला, :` जिल्ह्याचे भूषण असलेला मेळघाटातील ऐतिहासिक नरनाळा किल्ला, समृद्ध वनसंपदा आणि स्थानिक संस्कृती यांचे दर्शन घडवणारा नरनाळा महोत्सव येत्या दि. 15 ते 17 फेब्रुवारीदरम्यान उत्साहात साजरा होणार आहे. दीर्घ कालावधीनंतर महोत्सव होत असल्यामुळे जिल्ह्यातील निसर्ग पर्यटनप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, यानिमित्त आयोजिण्यात आलेल्या विविध उपक्रमांत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होत आहेत.

                                                                        जिल्हाधिकारी कार्यालय व वनविभाग, अकोट वन्यजीव विभाग यांच्या सहकार्याने निसर्गप्रेमींसाठी नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात विविध यंत्रणांच्या सहकार्याने नियोजन व पूर्वतयारी करण्यात आली आहे. महोत्सवाच्या माध्यमातून नरनाळा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व, स्थानिक संस्कृती, पर्यावरण संवर्धन आणि इको टुरिझमबाबत जनजागृती करण्याचा हेतू असून, साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच अनेकविध उपक्रम घेतले जाणार आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

                                                                                               राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते दि. 15 फेब्रुवारी रोजी दु. 4. 30 वा. महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. मान्यवर लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, निसर्गप्रेमी व मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित राहणार आहेत.

विविध स्पर्धांचे आयोजन 🏃🏿महोत्सवात निसर्ग पर्यटनावर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे तिन्ही दिवस सकाळी 6 ते सायंकाळी 6 दरम्यान ट्रेकिंग, जंगल सफारी, बोटिंग, नरनाळा किल्ला सफारी असे निसर्गपर्यटनाधारित कार्यक्रम होतील. 🚣🏿

दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता महिला व पुरूषांसाठी ‘मॅरेथॉन- संवर्धनासाठी धाव’ होणार आहे. त्यासाठी अकोट फॉरेस्ट डेपो ते श्री संत गजानन महाराज विहीर फाटा असे साधारणत: 12 किमी अंतर असेल.

चित्रकला स्पर्धा दि. 16 फेब्रुवारीला सकाळी 10 ते 2 दरम्यान विहीर फाटा परिसरात होईल व याच दिवशी दुपारी २ वाजता शहानूर येथे पाक कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यजीव छायाचित्रण स्पर्धाही आयोजिण्यात आली आहे.🦋

सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी 🦚महोत्सवात तिन्ही दिवस सांस्कृतिक कार्यक्रम सायं. 5 ते रा. 10 वा. दरम्यान होणार आहेत. दि. 15 फेब्रुवारीला ‘चला हवा येऊ द्या’ टीमचे प्रसिद्ध मराठी कलावंत कार्यक्रम सादर करणार आहेत. दि. 16 फेब्रुवारीला ‘शिवशंभो गर्जना टीम’कडून सादरीकरण होणार आहे. इंडियन आयडॉल विनर सलमान अली ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ सादर करणार आहेत. दि. 17 फेब्रुवारीला पद्मश्री कैलाश खेर यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ होणार आहे.

🐅निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती करणे व मानव आणि पर्यावरण यांच्यातील नाते दृढ करणे हा महोत्सवाचा प्रमुख हेतू आहे. ऐतिहासिक महात्म्य लाभलेला नरनाळा किल्ला व मेळघाटचे समृद्ध जंगल हे अकोला जिल्ह्याचे गौरवस्थान आहे. महोत्सवात अधिकाधिक निसर्गप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना, उपवनसंरक्षक राहूलसिंह टोलिया व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

०००

संबंधित पोस्ट

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पैठण तालुक्याचे विविध विकास कामाचा आढावा.सर्वसामान्यांच्या तक्रारी निवारणाबरोबरच विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर येत्या सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा साजरा होणार..

महिलांची सुरक्षितता व संरक्षणासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध – रुपाली चाकणकर- जनसुनावणीत 55 तक्रारींचा निपटाराĺ

vishwatmaklokswamivarta

४५ वे वार्षिक पुष्पप्रदर्शन ८ व ९ फेब्रुवारी रोजी; सहभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षाआता 28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला- प्रशिक्षण वर्ग पुढे ढकलले

vishwatmaklokswamivarta