vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नाथषष्ठी यात्रोत्सव पूर्वतयारी बैठक-भाविकांना स्वच्छता,सुरक्षा व सेवा द्यावी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नाथषष्ठी यात्रोत्सव पूर्वतयारी बैठक-भाविकांना स्वच्छता,सुरक्षा व सेवा द्यावी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)-पैठण येथे होऊ घातलेल्या नाथषष्ठी यात्रोत्सवात भाविकांना स्वच्छता, सुरक्षा व सेवा द्यावी. त्यासाठी प्रशासनाने सज्ज असावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

 जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज पैठण येथे नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या पार्श्वभुमिवर पूर्वतयारी बैठक घेतली. पैठण येथे दि. ५ मार्च रोजी प्रथेनुसार ‘तुकाराम बीज’ मुहूर्तावर संत एकनाथ षष्ठी यात्रा सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. दि. ९, १० व ११ मार्च दरम्यान षष्ठी, सप्तमी व अष्टमी पर्वावर यात्रा उत्सव साजरा होणार आहे. उत्सवाचे यंदा २२७ वे वर्ष आहे.

 उपविभागीय अधिकारी निलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, जलसंपदा विभागाच्या दगडी धरण उप-अभियंता श्रद्धा निंबाळकर, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, नायब तहसीलदार कैलास बहुरे व राहुल सुर्यवंशी उपस्थित होते.

 ‘पैठण येथे नाथषष्ठी यात्रा काळात पिण्याच्या पाण्यासाठी किमान २५ टॅंकर्स ३ दिवस अहोरात्र तैनात ठेवावे. स्वच्छता, विद्युत व वाहतूक व्यवस्था अद्यावत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. तसेच पवित्र स्नानासाठी जायकवाडी धरणातून सोडण्यात येणारे पाणी, सार्वजनिक स्वच्छता, विद्युत व्यवस्था, फिरती स्वच्छतागृहे, गावाबाहेर तात्पुरते बसस्थानक व वाहतूक मार्गातील बदल याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.

०००००

संबंधित पोस्ट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रायगड दौरा, ड्रोन व हवाई उपकरणांवर बंदी…

शेतीच्या व्यवहरातुन फसवणूक केल्या प्रकरणाी तालुका पोलीस स्टेशन येथे 420 चा गुन्हा दाखल

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ चे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर १० नोव्हेंबर २०२५ पासून उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

सरपंच ग्रामविकासाचे दूत – रोहयो मंत्री भरत गोगावले

विशेष लेख -मुख्यमंत्र्यांनी आखलाय 100 दिवसांसाठी 7 कलमी कृती आराखडा,प्रशासनाला मिळतोय शिस्तीचा धडा…!

vishwatmaklokswamivarta

आपले सरकार सेवा पोर्टलद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये वाढ करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस