vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भिवंडी मध्ये हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू…

भिवंडी मध्ये हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू…

ठाणे प्रतिनिधी: राज्यातील रस्ते अपघाताचे  प्रमाण सातत्याने वाढत असून अपघाती मृत्यूदरही वाढल्याचं दिसून येत आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडल्याची बातमी माध्यमांतून समोर येते. आता, मुंबई–नाशिक महामार्गावर सोनाळे परिसरात झालेल्या भीषण अपघातात भिवंडीतील  दोन ऑटो रिक्षा चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अज्ञात वेगवान वाहनाने ऑटो रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला आहे. याप्रकरणी, पोलीस दफ्तरी अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील घुंघट नगर परिसरात राहणारे ऑटो चालक राजकुमार गुप्ता (वय 40 वर्षे) आणि महेंद्र केसरवानी (वय 39 वर्षे) हे दोघेही एकाच ऑटो रिक्षातून (MH 04 KA 3124) भिवंडी बायपासमार्गे सोनाळे दिशेने जात होते. दरम्यान, त्यांची ऑटो रिक्षा मुंबई–नाशिक महामार्गावरील  सोनाळे जवळ पोहोचताच मागून आलेल्या एका अज्ञात वेगवान वाहनाने जोरदार धडक दिली. वाहनाची धडक इतकी भीषण होती की ऑटोमधील दोघे चालक रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ दोन्ही जखमींना उचलून भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नव्या रिक्षा परवान्यांना स्थगिती,वाहतूक कोंडी रोखणे, प्रदूषणाला आळा घालणे यासाठी राज्य शासनाने नव्या रिक्षा परवान्यांवर बंदी आणली आहे. याबाबत मुंबई मधील रिक्षा चालकांची समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. बहुतांश रिक्षा चालकांनी याचे स्वागत केले आहे. तर, तरुण रिक्षा चालकांनी हे रोजगाराचे साधन असल्याने असे करू नये, अशी मागणी केली आहे. मात्र, राज्य सरकारने नव्या रिक्षांना आता परवाने देण्यावर स्थगिती दिली असून आजपासूनच हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देताना नाशिक पोलिसांची तुलना ‘कंसा’शी करू नका ! – हिंदू जनजागृती समिती

उपमुख्यमंत्री कार्यालय  जनसंपर्क कक्ष )१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष फिल्डवर उतरून उपाययोजना करावी आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसमवेत व्हीसीद्वारे बैठक

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा वार्षिक योजना सन 2026 -2027 साठी 547.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता विकासकामांना गती, निधीचा प्रभावी वापर आणि वेळेत अंमलबजावणीवर भर

विशेष भारत मोशन पिक्चर असोसिएशनसोबत जागतिक स्तरावर उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

पेसा कायदा अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करा- मंत्री डॉ. अशोक वुईके

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती