vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी केली आरोग्य तपासणी आणि साहित्य नोंदणी; लवकरच होणार साहित्य वाटप शिबीर

राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी केली आरोग्य तपासणी आणि साहित्य नोंदणी; लवकरच होणार साहित्य वाटप शिबीर

बुलढाणा (जिमाका) दि. 9 : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात दिव्यांग बांधवांसाठी विशेष आरोग्य तपासणी व नोंदणी शिबिराच आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी उस्फुर्त सहभाग नोंदवत साहित्याची नोंदणी केली. या दिव्यांग बांधवांना लवकरच साहित्याचे वाटप विशेष शिबिर घेऊन वितरित करण्यात येणार आहे.

 

केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून आयुष मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य मेळावा संत नगरी शेगाव येथे नुकताच घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये आयुष आयुर्वेद युनानी होमिओपॅथी उपचार पद्धतीच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्यात. या शिबिरात दिव्यांग बांधवांसाठी 27 फेब्रुवारीला आरोग्य तपासणी व साहित्य नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्ह्याभरातील 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवून आपली तपासणी व साहित्याची नोंदणी केली. राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना कर्णयंत्र, चालण्याची काठी, कंबरपट्टा, पायाचा पट्टा, व्हीलचेअर, इलेक्ट्रिक व्हीलचेअर असं जवळपास एका लाभार्थ्याला दहा हजार रुपयांचे साहित्य वितरित करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवांचही वितरण करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांसाठी लागणाऱ्या साहित्याची नोंदणी केल्या गेली त्यानुसार हे साहित्य उपलब्ध झाल्यानंतर विशेष शिबिर घेऊन हे सर्व साहित्य वाटप केल्या जाणार आहे. शिवाय खासदार निधी अंतर्गत ही काही साहित्यांचे वाटप याच दिवशी केल्या जाणार आहे . साहित्य वाटप शिबिराची तारीख जाहीर करून यासंदर्भातची माहिती सर्व दिव्यांग बांधवांना देण्यात येणार आहे. बांधवांनी नोंदविलेल्या कृत्रिम अवयव बनवण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.00000

संबंधित पोस्ट

जिल्हास्तर युवा महोत्सवातील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरितायुवक-युवतींनी तसेच युवा मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करावी

vishwatmaklokswamivarta

सर्व पशुवैद्यकीय चिकित्सालये, तालुका व जिल्हा चिकित्सालये तसेच फिरते दवाखान्यांच्या कामकाजाच्या वेळा निश्चित

आरटीई’ प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ०१ प्रवेशासाठी मुदतवाढ; ०१ एप्रिल पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू

दहावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्कासह भरण्यास १७ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

मान्सून कालावधीत प्रत्यक्ष क्षेत्रपातळीवर जाऊन काम करावे- पालकमंत्री शंभूराज देसाई

अंगणवाडी आता फक्त पोषणाचे केंद्र नव्हे, तर उज्ज्वल, सक्षम आणि सुसंस्कारित भावी पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र बनल्या आहेत, अशा शब्दात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अंगणवाडी सेविकांच्या समर्पित कार्याचे कौतुक

vishwatmaklokswamivarta