vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय “अस्मिता लीग” क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न! 🏃‍♀️🏅

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय “अस्मिता लीग” क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न! 🏃‍♀️🏅

राज्य प्रतिनिधी-युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली मेरा युवा भारत (MY Bharat) व जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ मार्च २०२६ रोजी तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे जिल्हास्तरीय “अस्मिता लीग” क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत १३ ते १८ वर्षांवरील मुली तसेच महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. १०० मी., २०० मी. व ४०० मी. धावणे तसेच विविध मनोरंजनात्मक स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.

कार्यक्रमास आमदार श्वेताताई महाले, नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख, उपनगराध्यक्षा वैशालीताई खेडेकर, सहायक क्रीडा विकास अधिकारी अनुराधाताई सोळंकी, लेखाधिकारी रमेश अहिरकर, आकाश चाफेकर तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मान्यवर उपस्थित होते.तसेच खेलो इंडिया प्रशिक्षक अक्षय गोलांडे व आकाश साळोक यांच्यासह अनेक महिला व क्रीडाप्रेमींची उपस्थिती होती.

जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर व जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी सर्व सहभागी महिला व मुलींचे आभार मानत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संबंधित पोस्ट

गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

🚨 महाड पूरपरिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष आढावा

INS सतलज’ने मॉरिशसमध्ये जलमापन सर्वेक्षण मोहीम केली पूर्ण

vishwatmaklokswamivarta

महापालिका जिंकल्यावर सरकारच्या भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका” — उद्धव ठाकरे.

मुंबईतील वाहतूक सुलभ व सुरळीत होण्यासाठी मेट्रो आणि कोस्टलरोड सारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांचे महत्त्वप्रकल्पांमध्ये सुरुवातीला आलेल्या समस्या, कायदेशीर व पर्यावरणीय परवाने, नागरिकांचे प्रश्न अशा अनेक आव्हानांवर नियोजनबद्ध तयारी, भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित दिवंगत बी.जी.देशमुख स्मृती व्याख्यानमालेत अश्विनी भिडे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण सुधारित कार्यक्रम जाहीरसांगली जिल्ह्यात 93.98 टक्के मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- बीएलओमार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 17 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार- नागरिकांना मतदार यादीतील माहिती अचूक राहण्यासाठी बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन