vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यासह मुंबई, ठाण्यात गुढीपाडवा शोभा यात्रेला दिमाखात सुरुवात

 राज्यासह मुंबई, ठाण्यात गुढीपाडवा शोभा यात्रेला दिमाखात सुरुवात

राज्य प्रतिनिधी-अकोला शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरातून या महारॅलीला सुरुवात करण्यात आली. पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या वातावरणात रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. अखेरीस बिर्ला राम मंदिरात या रॅलीचा समारोप करण्यात आला.या महारॅलीत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोच्या संख्येने अकोलेकर सहभागी झाले होते. शहरातील अनेक ठिकाणी नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करत पुष्पवृष्टी केली. विशेष म्हणजे ‘संस्कृती संवर्धन समिती’कडून गेल्या १९ वर्षांपासून गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी अशा प्रकारच्या महारॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.अकोल्यात नववर्षाच्या स्वागताचा हा उत्साहपूर्ण सोहळा यंदाही मोठ्या जल्लोषात पार पडला.

कल्याणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये गेल्या 27 वर्षापासून गुढीपाडवा निमित्त शोभायात्रा निघत असते आज देखील कल्याण सांस्कृतिक मंच आणि जैन समाज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकाराने यावर्षी कल्याणमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे या मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे नागरिक सकाळपासूनच मिरवणूक मध्ये सहभागी झालेले आहेत मराठ मोळा हा नवीन वर्षाचा सण आहे या मिरवणूक मध्ये मराठी तरुणांनी आणि देखील डोक्यावरती भगवे फेटे घालून परिधान केले महिला बाईक वर फेटे बांधून गुडी घेऊन मिरवणुकीत सहभाग त्याचप्रमाणे जैन समाजाचे महिला, गुजराती समाजाची महिला,साउथ इंडियन वाद्या,नारीशक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मावळ्यां सोबत अशी घोड्यावरती स्वार होऊन भव्य अशी मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे यावर्षी कल्याण ती 27 व्या गुढीपाडव्याची मिरवणूक आहे रस्त्यावादी रांगोळ्या त्याचप्रमाणे चौका चौकामध्ये मिरवणुकीचा स्वागत केला जात आहे.

मालेगावात मराठी नववर्षाचा उत्साह शिगेला पोहोचला असून गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिलांची भव्य बाईक रॅली निघाली आहे. नऊवारी साडी आणि भगवे फेटे घालून महिलांचा अनोखा अंदाज पाहायला मिळत असून शहरातून काढलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी शंखनाद करत पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

संबंधित पोस्ट

प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जालना शहरात प्रचंड वाहतूक कोंडी;जनतेला होणारा मनस्ताप तात्काळ दूर करा – माजी नगराध्यक्ष भास्कररावअंबेकर

मातृभाषेतून शिक्षणामुळे शब्दसंग्रह, ज्ञानसंपदेत वाढ- शाहीर पाटील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

vishwatmaklokswamivarta

जालना येथे 27 मार्च रोजी  रोजगार मेळाव्याचे आयोजन

संत रविदासांच्या विचारांचा व्यापक अभ्यास, प्रसार होणे आवश्यक – मंत्री ॲड. आशिष शेलार ‘स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज ॲण्ड सोशल सायन्सेस’ने तयार केलेल्या संशोधन प्रकल्पाची केंद्र सरकारकडे तातडीने शिफारस करण्याचे निर्देश

मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षित वातावातावरणात पारपाडण्यासाठी,यंत्रणांनी समन्वयाने जबाबदाऱ्या पार पाडाव्यात**-जिल्हाधिकारी संतोष पाटील*

बहुचर्चित “उदयपूर फाइल्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला