vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

चोपडा शहरातील बांधकामासाठी ०.४५ मीटर उंचीची तरतूद लागू करण्यात येणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

चोपडा शहरातील बांधकामासाठी ०.४५ मीटर उंचीची तरतूद लागू करण्यात येणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, प्रतिनिधी : चोपडा शहरातील रत्नावती नदीलगतच्या पूररेषा क्षेत्रात बांधकामासाठी ०.४५ मीटर उंचीची तरतूद लागू करण्यात येणार असून त्याबाबतचे निर्देश लवकरच जारी केले जातील, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

चोपडा शहराची विकास योजना २० मे २०१६ पासून लागू असून रत्नावती नदीलगत पूररेषा निश्चित करण्यात आली आहे. या अंतर्गत उच्चतम पूररेषेत किमान २.५ मीटर उंचीचे (स्टील्ट) बांधकाम बंधनकारक आहे. मात्र २००६ नंतर मोठा पूर आलेला नसल्याने ही अट शिथील करून ०.४५ मीटर उंचीची तरतूद लागू करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, अशी लक्षवेधी सूचना सदस्य चंद्रकांत सोनवणे यांनी मांडली.

चोपडा शहर विकास योजनेनुसार उच्चतम पूररेषेत २.५ मीटर उंचीचे (स्टील्ट) बांधकाम बंधनकारक होते. मात्र, एकसंध विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) लागू झाल्यानंतर या संदर्भातील पूर्वीच्या तरतुदी रद्द ठरतात. युडीसीपीआरमध्ये स्पष्टपणे ०.४५ मीटर उंचीची तरतूद नमूद असल्याने, सदस्यांच्या मागणीनुसार तीच तरतूद चोपडा शहरासाठी लागू करण्यात येणार आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले.

0000

संबंधित पोस्ट

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ; ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खात संलग्न करा – कृषी विभागाचे आवाहन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या-  योजनेचा लाभ मिळण्याकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत 

नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ साठीशहरी परिवहन सेवेत आमूलाग्र बदल करावेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस§ शहरांमधील परिवहन सेवेच्या विकासासाठी स्वतंत्र एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण§ प्राधिकरण स्थापन करण्याचा कायदा करण्यापूर्वी हरकती, सूचना मागवा…

जिल्हाप्रशासन देणार शेतकऱ्यांना ‘हात मदतीचा’

रविवारचा आठवडी बाजार रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

vishwatmaklokswamivarta

विशेष वृत्त :संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी विशेष कृती दल· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला गोदरेज कन्झ्युमर कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद· एम्बेड प्रकल्पास गडचिरोली जिल्ह्यात लक्षणीय यश

vishwatmaklokswamivarta