vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा १ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात शुभारंभजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रभावी अंमलबजावणीचे आदेश..

’माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा १ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात शुभारंभजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रभावी अंमलबजावणीचे आदेश..

 

नांदेड प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी आणि निरोगी समाज निर्मितीसाठी ‘माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनानुसार, १ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात या अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आहे.

१ एप्रिलला विशेष ग्रामसभेचे आयोजनअभियानाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच १ एप्रिल २०२६ रोजी, जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ‘विशेष आरोग्य ग्रामसभा’ आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या ग्रामसभेमध्ये: * ग्रामस्थांना अभियानाच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली जाईल. * आरोग्य, स्वच्छता आणि शुद्ध पाणीपुरवठा या विषयांवर चर्चा करून ग्रामस्थांची भूमिका स्पष्ट केली जाईल. * लोकसहभागातून गाव ‘आरोग्य संपन्न’ करण्यासाठी सामूहिक संकल्प केला जाईल.

अभियानाचे स्वरूप व पुरस्कारहे अभियान केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजना आणि शाश्वत विकास ध्येयांशी (SDG-3) संलग्न आहे. या अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती, तालुका आणि जिल्ह्यांना राज्यस्तरावर कोट्यवधी रुपयांची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नववर्ष प्रण – सुरक्षित अन्न’ विशेष तपासणी मोहीम सुरू

श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा विकास थांबणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

२९ व्या राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे मंगळवारी उद्घाटन

एमएचटीसीईटी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान प्रा.जयंत विष्णू नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

vishwatmaklokswamivarta