vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यांत ‘डिजिटल शेतीशाळा’ 1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन· सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यांत ‘डिजिटल शेतीशाळा’ 1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन· सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

     अमरावती, प्रतिनिधी : हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत आहे. यावर मात करण्यासाठी कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत महाराष्ट्र राज्याकरिता “हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान” डिजीटल शेतीशाळा सुरू केली आहे.

       हे अभियान शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची हमी देणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाबरोबरच, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग इ. यंत्रणादेखील सहभागी होत आहेत. या अभियानाचा एक टप्पा म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात चार विशेष डिजिटल शेती शाळा’ आयोजित करण्यात येत आहेत.

   शेतकरी, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बिजोत्पादक, फार्मर कप स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे निमंत्रक व शेतकरी गट, वनपट्टे धारक या सर्वांनी मोठ्या संख्येने डिजिटल शेती शाळांना जॉईन व्हावे, असे आवाहन कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात येत आहे.

    राज्यातील सर्व प्रकारच्या पिक पद्धतींना उपयुक्त असणाऱ्या तंत्रांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागातील तज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांचेमार्फत या डिजिटल शेतीशाळामध्ये ज्ञानाचे आदान प्रदान होणार आहे.

विशेष डिजिटल शेतीशाळांचे वेळापत्रक व विषय पुढीलप्रमाणे आहे.· शेतीशाळा १ (१ एप्रिल २०२६) पेरणीपूर्व तंत्रज्ञान – बेड तयार करणे व बेडवर टोकण करणे, शून्य/कमीत कमी मशागत करणे, आंतरपीक पद्धत, बियाणे उगवण क्षमता तपासणी आणि बीजप्रक्रिया.

· शेतीशाळा २ (८ एप्रिल २०२६): जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन- बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती व फायदे शेतीशाळा ३ (१५ एप्रिल २०२६): एकात्मिक कीड व्यवस्थापन- सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र किटकांचे संवर्धन, लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर

· शेतीशाळा ४ (२२ एप्रिल २०२६) : भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र- भाताची थेट पेरणी श्री पद्धत आणि भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धत

सर्व शेतीशाळा वर नमूद तारखांना सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणार असून या शेती शाळांचे लाइव्ह प्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन आणि उमेद च्या युट्यूब चॅनेलवर केले जाणार आहे.

000

संबंधित पोस्ट

महाराष्‍ट्र लोकभवनाच्या पुढाकाराने बृहन्‍मुंबई महानगरपालिका मंगळवारपासून ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करीत असून अभियानाचा आरंभ राज्‍यपाल जिष्‍णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता (दि. २६ मे) धारावी व सायन येथे

नाशिक जिल्ह्यात दोन महत्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची अचूक माहिती संकलित होणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार – मंत्री बाबासाहेब पाटील पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कन्यादान योजनेंतर्गत अर्थसहाय्यासाठी स्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

मोठी बातमी: पश्चिम बंगालमध्ये नव्या पर्वाची सुरुवात! शुभेंदु अधिकारी यांची भाजप विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड; राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून होणार नियुक्ती 

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरात मेगा पदयात्रेचे आयोजन**नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा* *जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta