vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एसएनएल कर्मचाऱ्यांच्या वेतन पुनरीक्षणासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांना निवेदन

एसएनएल कर्मचाऱ्यांच्या वेतन पुनरीक्षणासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांना निवेदन

       राज्य प्रतिनिधी   जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मधील कर्मचाऱ्यांच्या मागील नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतन पुनरीक्षणाच्या प्रश्नाबाबत केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन सादर केले आहे.

            बीएसएनएल ही देशातील एक महत्त्वाची सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार संस्था असून, ग्रामीण, दुर्गम व वंचित भागांमध्ये दूरसंचार सेवा पोहोचविण्यात तिची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली आहे. खासदार डॉ. काळे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, सुमारे ६० हजार बीएसएनएल कर्मचारी मागील जवळपास नऊ वर्षांपासून वेतन पुनरीक्षणापासून वंचित आहेत, ही अत्यंत गंभीर व अन्यायकारक बाब आहे.

केंद्र व राज्य शासन तसेच इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये नियमित वेतन पुनरीक्षण होत असताना बीएसएनएल कर्मचाऱ्यांवर होत असलेला हा भेदभाव त्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम करत असून त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेलाही बाधा निर्माण करत आहे, असे त्यांनी अधोरेखित केले आहे.

तसेच, “अफोर्डेबिलिटी क्लॉज” या अटीमुळे वेतन पुनरीक्षणास विलंब होत असल्याचे निदर्शनास आणून देत, या अटीची पुनर्समीक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीएसएनएल ही केवळ व्यावसायिक संस्था नसून डिजिटल इंडिया, ग्रामीण कनेक्टिव्हिटी आणि सामाजिक समावेशनासाठी महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खासदार डॉ. काळे यांनी केंद्र सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन बीएसएनएल कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी ठाम मागणी केली आहे. या प्रश्नाचा संबंध केवळ वेतनाशी नसून लाखो कुटुंबांच्या जीवनमानाशी आणि भविष्यासोबत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

कल्पना बोर्डे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

vishwatmaklokswamivarta

१३५ वर्षांची शिक्षण परंपरा: अक्षीकर पुरस्कारांनी आदर्श शिक्षकांचा सन्मान”छबिलदास शाळा, दादर येथे जनरल एज्युकेशन सोसायटीचा १३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा !

मुंबईतून धक्कादायक बातमी वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार, आरोपीस अटक

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या धारावीतील ज्येष्ठ नागरिकांशी पोलिसांनी साधला संवाद..

पंतप्रधानांच्या शुभहस्ते २० जूनला ‘पी.एम. किसान’च्या २३ व्या हप्त्याचे वितरण देशभरात साजरा होणार ‘किसान उत्सव दिवस’

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta