vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मैदान गाजवले, मनेही जिंकली; महसूल क्रीडा स्पर्धेत जालना जिल्ह्याचा डंका • जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रत्यक्ष सहभागाने खेळाडूंमध्ये संचारले नवचैतन्य 

मैदान गाजवले, मनेही जिंकली; महसूल क्रीडा स्पर्धेत जालना जिल्ह्याचा डंका • जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रत्यक्ष सहभागाने खेळाडूंमध्ये संचारले नवचैतन्य

• टेबल टेनिसच्या मैदानात जिल्हाधिकाऱ्यांची फटकेबाजी; जालन्याला सर्वसाधारण उपविजेतेपद • ‘जबरदस्त है जिसका खेलना, वो है जिल्हा जालना’ घोषणांनी दुमदुमले अश्वमेध मैदान• अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल सांघिक क्रीडा     प्रकारात ठरले विजयी

 

जालना, प्रतिनिधी- परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अश्ववेध मैदानावर आयोजित ‘छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा’ जालन्याच्या अष्टपैलू कामगिरीने गाजली. दि.3 ते 5 एप्रिल 2026 दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत जालना जिल्ह्याने केवळ मैदानी खेळातच नव्हे, तर सांस्कृतिक कार्यक्रमातही बाजी मारत प्रेक्षक आणि परीक्षकांची मने जिंकली. रविवार दि.5 एप्रिल 2026 रोजी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पारितोषिक वितरण समारंभात जालना जिल्ह्याला विभागीय सर्वसाधारण चॅम्पियनशिपमध्ये द्वितीय उपविजेता म्हणून गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडून मैदानावर प्रोत्साहन

जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या स्पर्धेदरम्यान वेळोवेळी स्वतः मैदानावर उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढविला. त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे खेळाडूंमध्ये एक वेगळेच नवचैतन्य संचारले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रोत्साहनामुळेच खेळाडूंनी आपले सर्वस्व पणाला लावून विविध खेळांमध्ये विजयश्री खेचून आणला. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा खेळातील प्रत्यक्ष सहभाग. केवळ मार्गदर्शक म्हणून न थांबता, जिल्हाधिकारी मित्तल स्वतः टेबल टेनिसच्या मैदानात उतरल्या. त्यांनी हाती बॅट घेत चपळाईने केलेले सर्व्हिस आणि स्मॅश पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांच्या या स्पोर्ट्समन स्पिरीटमुळे जालना संघातील खेळाडूंमध्ये वेगळेच नवचैतन्य निर्माण झाले. केवळ प्रशासकीय कामातच नव्हे, तर खेळाच्या मैदानातही आपण तितकेच तत्पर आहोत, हे त्यांनी टेबल टेनिसच्या स्पर्धेत उतरून दाखवून दिले. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच खेळाप्रती असलेली त्यांची ही ओढ खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरली. त्याच बरोबर जालना महसूल विभागातील अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल सांघिक क्रीडा प्रकारात विजयी ठरले असून त्यांनी स्पर्धेच्या कालावधीत सर्व संघ हाताळण्याचे काम नियोजनबध्द व कुशलपणे पार पाडले. तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील क्रीडा स्पर्धेत सहभाग घेत विजयाचा पाया रचला आहे.

सांस्कृतिक सादरीकरणाने जिंकली मने,केवळ मैदानी खेळातच नव्हे, तर सांस्कृतिक व्यासपीठावरही जालना जिल्ह्याने आपली छाप पाडली. सांस्कृतिक कार्यक्रमात जालन्याच्या चमूने सादर केलेल्या कलाविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. महसूल विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या या कलागुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्याचा संघ या विभागीय क्रीडा स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत विविध स्पर्धा प्रकारात जालन्याचे नाव उंचावले आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व कलाकार, खेळाडूंचे कौतुक करत अभिनंदन केले.

वैयक्तिक खेळ प्रकारात बुध्दीबळ प्रथम क्रमांक प्रशांत हरिशचंद्रे, टेबल टेनिस एकेरी प्रथम क्रमांक रवि वैद्य तर दुहेरीत द्वितीय क्रमांक शशिकांत हदगल व रवि वैद्य, बॅडमिंटन दुहेरी द्वितीय क्रमांक कृष्णा मुजमुले व सोमनाथ सर फळे, 100 मिटर धावणे द्वितीय क्रमांक राहुल साळवे, 400 मिटर धावणे प्रथम क्रमांक योगेश पोटे, उंच उडी प्रथम क्रमांक कृष्णा सोनवणे, गोळा फेक प्रथम क्रमांक राजेश खांडेभराड, थाळी फेक तृतीय क्रमांक प्रकाश जाधव, जलतरण ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम तर फ्री स्टाईल द्वितीय क्रमांक स्वप्निल चौधरी, जलतरण प्रथम क्रमांक अनिरुध्द झुमडे, 45 वर्षावरील पुरुष थाळी फेक द्वितीय क्रमांक प्रकाश जाधव, टेबल टेनिस मिश्र प्रथम क्रमांक प्रणाली तायडे व शशिकांत हदगल, 45 वर्षावरील पुरुष लॉन टेनिस एकेरी सुनिल केंधळे तर दुहेरीत सुनिल केंधळे व रमेश मिसाळ, कॅरम महिला एकेरी द्वितीय क्रमांक सरिता गुंजकर, महिला बॅडमिंटन एकेरी द्वितीय क्रमांक शितल सराटे तर दुहेरी शितल सराटे आणि रश्मी पिलडेकर, 100 ‍मिटर व 200 मिटर धावणे प्रथम क्रमांक मोहिनी कोळसे, 400 मिटर धावणे प्रथम क्रमांक निता मुळूक, उंच उडी प्रथम क्रमांक तत्पर्ता पाटील, लांब उडी प्रथम क्रमांक मोहिनी कोळसे, गोळा फेक द्वितीय क्रमांक मोहिनी कोळसे, थाळी फेक द्वितीय क्रमांक पुजा चव्हाण, पुरुष सांघिक खेळ प्रकारात 4 x 100 रिले प्रथम क्रमांक, महिला सांघिक खो खो प्रथम क्रमांक, महिला सांघिक खेळ प्रकारात 4×100 रिले प्रथम क्रमांक तर 4 x 400 रिले प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे. याप्रमाणे एकुण 221 क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा प्रकारात जालना महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

शासकीय आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या बँकाना 31 मार्च रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश..

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहचविण्यासह देशाची एकता, अखंडता मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया – उपमुख्यमंत्री

साकीनाका येथे बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश, फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक*

vishwatmaklokswamivarta

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही – राज्य निवडणूक आयोग शनिवार दि. १५ रोजी देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

vishwatmaklokswamivarta

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस▪️सीएसआर प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग (एपीटीएल) प्रणालींची स्थापना

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

vishwatmaklokswamivarta