vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

ॲथलेटिक्स खेळाडूच्या निवड चाचणीचे आयोजन

ॲथलेटिक्स खेळाडूच्या निवड चाचणीचे आयोजन

 जालना, प्रतिनिधी :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्षवेध’ या धोरणात्मक योजनेतंर्गत जालन्यात क्रीडा क्रांती होणार आहे. या योजनेनुसार जालना येथे आर्चरी (धनुर्विद्या) आणि ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारांसाठी जिल्हा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारासाठी खेळाडूंची विशेष निवड चाचणी आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

या निवड चाचणीत 21 वर्षांखालील मुले व मुली सहभागी होऊ शकतात. खेळाडूकडे जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, 3 पासपोर्ट साईज फोटो, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि पालकांचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे. तसेच खेळाडू महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे. खेळाडूनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे क्रीडा मार्गदर्शक आशिष जोगदंड (संपर्क- ८८८८३४६८२८) यांच्याशी संपर्क साधावा.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्ह्याने कायम राखली सर्वसाधारण विजेतेपदाची परंपरा-विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्हा अव्वल

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा क्रीडा संकुलमधील नूतनीकरण केलेल्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण

भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने बेल्जियमविरुद्धच्या शानदार विजयाने युरोप दौऱ्याची सुरुवात केली.

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आयोजितप्रशासन चषक क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनींमध्येसरळ प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचणी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26