vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

आदिवासी विद्यार्थ्यांनी नामांकित इंग्रजी शाळेत मोफत प्रवेशासाठी 25 मे पर्यंत अर्ज करावेत

आदिवासी विद्यार्थ्यांनी नामांकित इंग्रजी शाळेत मोफत प्रवेशासाठी 25 मे पर्यंत अर्ज करावेत

जालना, द प्रतिनिधी:- अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग उचलणार असून, पात्र विद्यार्थ्यांनी दि. 25 मे 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

अर्जासोबत अनुसूचित जमातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत. सक्षम अधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला. विद्यार्थ्याचे आधार कार्ड आणि दोन पासपोर्ट साईज फोटो. जन्म तारखेचा पुरावा. वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. पालकांचे संमतीपत्रक. दारिद्र्यरेषेखालील असल्यास शिधापत्रिकेची प्रत व अनुक्रमांक आदि कागदपत्रे जोडावयाची आहेत.

या योजनेसाठीचे प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. इच्छुक पालकांनी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, रिलायन्स मॉलच्या पाठीमागे, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर’ येथील शिक्षण विभागात संपर्क साधून आपले अर्ज दि. 25 मे पर्यंत सादर करावेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्याकडून विचारपूस

महिलांच्या सक्षमीकरणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे राज्यभरात ‘शस्त्रपूजन’ आणि ‘शौर्यजागृती’ उपक्रम लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची युवतींची लोकप्रतिनिधींकडे मागणी 

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबिर 

आणीबाणीच्‍या काळात कारावास भोगलेल्या व्‍यक्‍तींनी अर्ज करावेत..

vishwatmaklokswamivarta

द्रमुक सरकार उलथवुन टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* तामिळनाडुत रिपब्लिकन पक्षाचे 18 उमेदवार निवडणुक रिंगणात*   

अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते महाआरती