vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

१ मे पासून महाराष्ट्रात जनगणनेचा श्रीगणेशा! नागरिकांनी सहभाग नोंदवावा; संचालक निरुपमा डांगे यांचे आवाहन

१ मे पासून महाराष्ट्रात जनगणनेचा श्रीगणेशा! नागरिकांनी सहभाग नोंदवावा; संचालक निरुपमा डांगे यांचे आवाहन

 

महाराष्ट्र राज्यातील जनगणना संचालन आणि नागरिक नोंदणी विभागातर्फे १ मे पासून जनगणनेच्या कामाला सुरुवात होत आहे. या प्रक्रियेत राज्यातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन संचालक निरुपमा डांगे यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाप्रती असलेल्या वचनबद्धतेनुसार माहिती संकलन आणि प्रसाराची गुणवत्ता तसेच कार्यक्षमता सुधारण्यासह निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनगणना २०२७ व्यापक प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच स्व-गणना पध्दत सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून व्यक्तींना जनगणनेशी निगडित त्यांचा कौटुंबिक तपशील स्वतंत्रपणे ऑनलाइन पूर्ण भरता येईल, आणि सादर करता येईल, अशी माहिती महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

देशात प्रथमच, २०२७च्या जनगणनेच्या माहितीचे संकलन डिजिटल पद्धतीने केले जाईल, ज्यामध्ये स्व-गणना हा देखील एक पर्याय असेल. महाराष्ट्र राज्यासाठी, घर-यादी आणि गृहगणनेचा कालावधी सुरू होण्यापूर्वी स्व-गणना करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून तो १ मे २०२६ ते १५ मे २०२६ असा आहे.

भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने एक समर्पित वेब पोर्टल विकसित केले असून हे पोर्टल म्हणजे जनगणनेत सहभागी होण्यासाठी एक सुरक्षित आणि सुलभ माध्यम आहे. अधिकृत पोर्टल https://se.census.gov.in येथे पाहता येईल, असेही डॉ.डांगे यांनी यावेळी सांगितले.

संबंधित पोस्ट

अतिदुर्गम आदिवासी वाड्या-पाड्यांमध्ये जाऊन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा रुग्णांशी थेट संवाद

vishwatmaklokswamivarta

इंडिया मेरीटाईम वीकसाठी केंद्राने मुंबईत कायमचे केंद्र उभारावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस२७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नेस्को, गोरेगाव येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’ चे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून गत आठ महिन्यात उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीन क्लस्टरचे काम पूर्ण, पाच क्लस्टरला मंजुरी- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta

शिवव्याख्यानांच्या आयोजनातून राजधानीत शिवजयंती उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

महापालिका, नगर परिषद व नगर पंचायती क्षेत्रात‘कर मुल्यांकनासाठी’ विशेष मोहीम राबविणार   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल …

vishwatmaklokswamivarta

कारगिल युद्धातील सैनिकांचे बलिदान अविस्मरणीय – पालकमंत्री शंभूराज देसाई कारगिल विजय दिनानिमित्त वीरमाता, वीरपत्नी व वीरपिता यांचा सत्कार