vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सह आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे सेवानिवृत्त सेवाकाळातील योगदानाचा गौरव..

सह आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे सेवानिवृत्त सेवाकाळातील योगदानाचा गौरव…

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी) : विभागीय आयुक्त कार्यालयातील सह आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारंभात प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत भावनिक निरोप दिला.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी डॉ. गव्हाणे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ते म्हणाले, “डॉ. अनंत गव्हाणे यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणा, शिस्त आणि लोकाभिमुख दृष्टीकोन जपला. त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत प्रशासनात सकारात्मक ठसा उमटवला. त्यांची काम करण्याची पद्धत आणि सहकार्याची वृत्ती इतर अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी डॉ. गव्हाणे यांनीही आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगत सहकाऱ्यांचे आभार मानले. त्यांनी प्रशासनात काम करताना मिळालेल्या सहकार्यामुळेच जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता आल्या, असे नमूद केले.

यावेळी अपर आयुक्त रिता मेत्रेवार, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी व प्रताप काळे उपस्थित होते. तसेच त्यांच्या पत्नी सौ. सुषमा गव्हाणे, मुलगा डॉ. निखिल तसेच कुटुंबीय उपस्थित होते. विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

महागणेशोत्सव : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे23 ऑगस्ट रोजी मुंबईत आयोजन.

आज मुंबईत भाऊबीजेनिमित्ताने धावणार बीइएसटी च्या अतिरिक्त बसेस..

vishwatmaklokswamivarta

छठपूजा सणानिमित्ताने संभाव्य गर्दीच्या नियोजनासाठी भारतीय रेल्वे पुढील 5 दिवसांमध्ये 1,500 विशेष गाड्या चालवणार; प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास केंद्रस्थानी असणार

vishwatmaklokswamivarta

शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी स्व-गणना करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

गडचिरोलीच्या कायापालटासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार : आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची ग्वाही

जिल्ह्यात फेरफार अदालत,२२१० प्रकरणे निकाली..

vishwatmaklokswamivarta