vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गडचिरोली पॅटर्न: ‘घाटो कट्टा’च्या माध्यमातून महिला होणार आत्मनिर्भर; सहपालकमंत्र्यांच्या हस्ते ६ फिरत्या रेस्टॉरंटचे लोकार्पण

गडचिरोली पॅटर्न: ‘घाटो कट्टा’च्या माध्यमातून महिला होणार आत्मनिर्भर; सहपालकमंत्र्यांच्या हस्ते ६ फिरत्या रेस्टॉरंटचे लोकार्पण

गडचिरोली प्रतिनिधी: गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी ‘उमेद’ अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते जिल्हयातील सहा महिला प्रभागसंघांना ‘घाटो कट्टा’ (Food Van) या फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी एक पथदर्शक ‘मॉडेल’ ठरेल, असा विश्वास सहपालकमंत्री यावेळी व्यक्त केला.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार बळ,सुरजागड लोहप्रकल्पामुळे बाधित झालेल्या अहेरी आणि एटापल्ली तालुक्यातील महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या फिरत्या व्हॅनच्या माध्यमातून महिलांना केवळ रोजगारच मिळणार नाही, तर त्यांच्या ‘दरडोई उत्पन्नात’ (Per Capita Income) वाढ होऊन त्या स्वयंपूर्ण होतील, असे प्रतिपादन सहपालकमंत्र्यांनी केले.

‘घाटो कट्टा’ उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये: शाश्वत रोजगार: महिला बचत गटांना १ लाख रुपये देण्याची योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबवली जात असून, ‘घाटो कट्टा’ त्यापुढील महत्त्वाचा टप्पा आहे. महिलाच चालक आणि कारागीर: या व्हॅनचे संचालन पूर्णपणे महिलांकडे असून, त्या स्वतः व्हॅन चालवतील आणि सकस आहार तयार करतील.

 विशेष प्रशिक्षण: यासाठी महिलांना आर-सेटी (R-SETI) मार्फत वाहन चालविण्याचे आणि विविध खाद्यपदार्थ बनवण्याचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. आरोग्यदायी आहार: लोहप्रकल्प परिसरातील वाढती गर्दी लक्षात घेता, अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना या व्हॅनद्वारे शुद्ध आणि पौष्टिक आहार वाजवी दरात उपलब्ध होईल.”जिल्हा नियोजन समितीच्या ३ टक्के राखीव निधीतून आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा हा गडचिरोली पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्र फॉलो करेल. नारीशक्तीला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रशासनाने केलेले हे काम कौतुकास्पद आहे.” असे मत सहपालकमंत्री यांनी याप्रसंगी व्यक्त केले

 भविष्यातील वाटचाल,या उपक्रमासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून सुमारे ८८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एका व्हॅनची किंमत जवळपास १४ लाख रुपये असून त्यात सर्व आधुनिक सोयीसुविधांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील महिला आता व्यावसायिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत

यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहूल काळभोर तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उमेद अभियानाचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या

00000

संबंधित पोस्ट

महाड येथील दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर) न्यायालयाच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ संपन्न,राज्य शासनाचे न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास विशेष प्राधान्य — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

राज्य शासनाची भूमिका -. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात बैठक

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे

गोवा बनावटीची अवैध दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

vishwatmaklokswamivarta