vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आपलं मंत्रालय’ अंकाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आपलं मंत्रालय’ अंकाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते प्रकाशन

      मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या एप्रिल 2026 या अंकाचे प्रकाशन सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अतिथी संपादक डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते करण्यात आलेN

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, प्रधान सचिव तथा महासंचालक यांचे विशेष कार्यअधिकारी इर्शाद बागवान उपस्थित होते.‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या या अंकामध्ये विविध विषयांचा समतोल आणि आशयपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. राजशिष्टाचार उपविभागाचा विस्तार केल्यामुळे राज्याच्या आर्थिक विकास व रोजगार निर्मितीला गती मिळणार आहे याची माहिती देण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या समकालीन विषयावरील लेखांच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञानातील नव्या घडामोडींची माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अंकात करण्यात आला आहे. शासन व्यवस्थेतील महसूली संकल्पना असो किंवा बदलत्या काळातील महिला आणि डिजिटल सुरक्षेचा प्रश्न असो अशा विविध विषयाची मांडणी या अंकात करण्यात आलेली आहे.

मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अंक प्रकाशित करण्यात येतो.

#आपल मंत्रालय

संबंधित पोस्ट

भारत – पोर्तुगाल पुनर्प्रस्थापित राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण महाराष्ट्रासोबत सहकार्य वाढविण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक- राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा

जिल्हा पाणी व स्वच्छता समिती बैठक जलजीवन मिशन’साठी कालबद्ध कार्यक्रम राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त भव्य प्रभात फेरी

अतिवृष्टीग्रस्त मदतीचे जिल्ह्यात ६७ कोटी ४३ लक्ष रुपयांचे वाटप

vishwatmaklokswamivarta

एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबिरा’चे उद्घाटन

जिल्हा कारागृहातील विकास कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta