vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला व चिमुकला बेपत्ता; धाड पोलिसांकडे मिसिंग दाखल

महिला व चिमुकला बेपत्ता; धाड पोलिसांकडे मिसिंग दाखल

बुलढाणा, प्रतिनिधी: धाड पोलीस स्टेशन अंतर्गत चांडोळ येथील विवाहित महिला व तिचा दोन वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धाड पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग क्रमांक ०४/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन सुनिल देशमुख (वय ३६, रा. चांडोळ ता. जि. बुलडाणा) यांनी २३ एप्रिल २०२६ रोजी धाड पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून तक्रार दिली. त्यांची पत्नी सौ. वैशाली सचिन देशमुख (वय २४) या १८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यानंतर पांग्री येथील नातेवाईकांकडे ठेवलेले सामान आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा श्री सचिन देशमुख (वय २ वर्ष) हाही होता.

संध्याकाळपर्यंत त्या घरी परत न आल्याने नातेवाईक व परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, दोघांचाही ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर धाड पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची नोंद करण्यात आली.

हरविलेल्या महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : उंची अंदाजे ५.५ फूट, रंग गोरा, केस काळे व वाढलेले.

या महिला व बालकाबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास धाड पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चौकशी अधिकारी शांताराम जाधव, सहायक फौजदार, पोलीस स्टेशन धाड हे करीत आहेत.

00000

संबंधित पोस्ट

शिवजयंती दिनी ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेचे आयोजन-पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी पदयात्रेचे काटेकोर नियोजन करून यशस्वी करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta

डॉ. अगरवाल हॉस्पिटल तर्फे धारावीत मोफत डोळे तपासणी शिबिर

vishwatmaklokswamivarta

.उत्तर भारतात झालेल्या मोठ्या हिमवृष्टीमुळे आणि पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आता कडाक्याच्या थंडीची चाहूल…

vishwatmaklokswamivarta

आजपासून पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सातत्य, एकाग्रता आणि समर्पण ही यशाची त्रिसूत्री – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ‘एनएडीपी’त दीक्षान्त समारंभ उत्साहात

रविवारी (दि.११) शहरातील काही भागात‘ब्लॅकआऊट’चा सराव; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन