vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

नमुंमपा आरोग्य विभागामार्फत टीबी मुक्त भारत 100 दिवसांची विशेष माहिम

नमुंमपा आरोग्य विभागामार्फत टीबी मुक्त भारत 100 दिवसांची विशेष माहिम

 

         आरोग्य प्रतिनिधी-  जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने दिनांक 24 मार्च 2026 पासून “टीबी मुक्त भारत” या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी 100 दिवसांची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. क्षयरोग निर्मुलनासाठी गती देण्याकरीता टीबी मुक्त भारत अभियान मोहिम राबविण्यात येत असून या अभियानाचा उद्देश लपून असलेले टीबी रुग्ण शोधून लवकरात लवकर उपचारावर आणून टीबी मृत्यू कमी करणे तसेच समाजामध्ये व्यापक जनजागृती निर्माण करणे हा आहे.

    या 100 दिवसांच्या अभियानादरम्यान 60 वर्षावरील नागरिक, मधुमेह असलेले, क्षयरुग्णांचे सहवासित, क्षयरोगाचे उपचार घेतेलेले रुग्ण, 18.5 पेक्षा BMI कमी असलेले व्यक्ती इ. जोखमीच्या गटांमध्ये क्षयरोगाचा धोका जास्त असल्याने अभियान अंतर्गत्‍ छातीचा एक्सरे द्वारे तपासणी करण्यात येत आहे. सदर सेवा देण्याकरीता कार्यक्षेत्रात आयुष्मान आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये इतर आरोग्य सेवा जसे की मधुमेह तपासणी, उच्च रक्त्दााब तपासणी, कुष्ठरोग तपासणी इ., करण्यात येते तसेच संशयित रुग्णांची मोफत तपासणी व त्वरित निदान, टीबी रुग्णांना नियमित औषधोपचार व पोषण सहाय्य (निक्षय पोषण योजना), शाळा, महाविद्यालये व समुदाय पातळीवर जनजागृती कार्यक्रम, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व आरोग्य संस्थांशी समन्वय वाढविणे इ. महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. नमुंमपा कार्यक्षेत्रात दि. 24 मार्च 2026 पासून एकूण 79 आयुष्मान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये एकूण 7901 लाभार्थ्यांनी शिबीरांचा लाभ घेतला आहे.

     क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. मात्र, वेळेत निदान व उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, वजन घटणे, ताप येणे, रात्री घाम येणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी.

    या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मा. आयुक्त नमुंमपा यांच्यामार्फत करण्यात येत आहे.“टीबी मुक्त भारत” हे आपले सामूहिक ध्येय असून, प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. चला, आपण सर्वजण मिळून टीबी विरुद्ध लढा देऊया आणि भारताला टीबीमुक्त बनवूया.

00000

संबंधित पोस्ट

चिमुकलीचा जीव वाचविला नाही तर जग माफ करणार नाही’- डॉ. सुधा कांकरिया लिंगगुणोत्तर कमी असलेल्या १६ गावांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न.

जिल्ह्यातील रुग्णांनी आता घर बसल्या मोफत बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात दि.17नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2025 या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम अभियानाचे आयोजन,आशा सेविका व स्वयंसेवक जिल्ह्यातील एकूण 5 लाख 6 हजार 841 घरांना देणार भेटी;एकूण 23 लाख 30 हजार 871 लोकसंख्यंचे होणार सर्वेक्षण

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारणीला गती — जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने अंमलबजावणीचे आदेश

vishwatmaklokswamivarta

शंभर दिवसीय’ क्षय रुग्ण शोध मोहिमेस सहकार्य करावे -जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सतीश कोपुरवाड 

चांडोळ व शेळगाव आटोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट

vishwatmaklokswamivarta