vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर

राज्यातील इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर

राज्य प्रतिनिधी-राज्यातील इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 आणि भाग-2 भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, 8 मे 2026 पर्यंत एकूण सात लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग- 1 भरून नोंदणी केली आहे.

इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहिती व सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज सादर करावेत. प्रवेश प्रक्रियेमध्ये तीन नियमित फेऱ्या, ओपन टू ऑल चौथी फेरी, मुलींकरीता विशेष पाचवी फेरी घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर संपर्क साधता येणार असून 8530955564 हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

0000

0

संबंधित पोस्ट

नवीन इमारतीत मराठी भाषिक व्यक्तींना घरे खरेदी करण्यासंदर्भातील धोरण करणार- मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

vishwatmaklokswamivarta

ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्त नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दक्षता पथकाची कारवाई; तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

बुलढाणा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वअभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी

पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील पर्यटन उद्योगाला जागतिकस्तरावर चालना मिळेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वार्षिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत विविध स्पर्धकांचा सहभाग जागतिक क्रीडा कॅलेंडरमध्ये पुण्याचे नाव स्थापित होणार