vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राज्यातील सर्वात मोठ्या 50 बेड्स क्षमतेच्या नमुंमपा डायलिसीस सेंटरची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी 

राज्यातील सर्वात मोठ्या 50 बेड्स क्षमतेच्या नमुंमपा डायलिसीस सेंटरची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी

नवी मुंबई प्रतिनिधी- शरीरातील मूत्रपिंडांची अर्थात किडनीची कार्यक्षमता अत्यंत कमी झाल्यानंतर डायलिसीस करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. सर्वसाधारपणे एक वेळेच्या डायलिसीसला 3000 ते 3500 इतका खर्च येतो व आठवड्यातून 2 ते 3 वेळा डायलिसीस करावे लागले तर सर्वसाधारण रूग्णाला हा खर्च करणे आवाक्याबाहेर होते. ही परिस्थिती लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेने वाशी सेक्टर 14 येथील विवेकानंद सांस्कृतिक केंद्र इमारतील 50 बेड्स क्षमतेचे स्पेशल डायलिसीस सेंटर सुरू केले असून एकाच छताखाली इतक्या मोठ्या संख्येने डायलिसिस बेड्स उपलब्ध असणारे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे डायलिसिस सेंटर आहे

         महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी पाहणी करीत त्याठिकाणी उपलब्ध असलेल्या विनामूल्य डायलिसिस सुविधेचा जास्तीत जास्त गरजू नागरिकांना उपयोग व्हावा यादृष्टीने या डायलिसीस सेंटरची माहिती जास्तीत जास्त प्रसारित करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.

   राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) कार्यक्रमातील एनसीडी (NCD – Non-Communicable Diseases) अभियान अंतर्गत हे 30 वर्षांवरील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याची माहिती देत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या तपासणीव्दारे प्राधान्याने मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (Hypertension), कर्करोग (Cancer – स्तन, गर्भाशय, मुख), हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या आजारांचे लवकर निदान करणे, त्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश नजरेसमोर ठेवण्यात आलेला आहे असे सांगितले.

 सध्या मधुमेहाचे प्रमाण खूप वाढल्याचे दिसत असून त्यादृष्टीने डायलिसिसची वाढती गरज लक्षात घेऊन महानगरपालिकेने या स्पेशल डायलेसिस सेंटरमध्ये एकाच छताखाली 50 तसेच महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयात 10, नेरूळ रूग्णालयात 11, ऐरोली रूग्णालयात 11 तसेच सेक्टर 8 सीबीडी बेलापूर येथील सेंटरमध्ये 3 अशाप्रकारे एकूण 85 बेड्सची डायलिसीस सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

0000

संबंधित पोस्ट

आरोग्य यंत्रणांचा आढावाजिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करा-जिल्हाधिकारी स्वामी

महिलांसाठी ‘सशक्त’ अभियान

vishwatmaklokswamivarta

*उंडाळे व काशीळ येथे0आरोग्य शिबिराचे आयोजन* 

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रुग्णालयात जागतिक कर्करोग दिवस साजरा

vishwatmaklokswamivarta

हिंद-की-चादर’ शताब्दी समागमासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज*लाखो भाविकांसाठी 15 दिवस व्यापक आणि मोफत वैद्यकीय सेवा..

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत185 लाभार्थींची मोफत इको तपासणी