vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सीएनजी दुर्घटना नियंत्रणासाठी विविध यंत्रणांची संयुक्त रंगीत तालीम• लातूरमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रभावी सादरीकरण..

सीएनजी दुर्घटना नियंत्रणासाठी विविध यंत्रणांची संयुक्त रंगीत तालीम• लातूरमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रभावी सादरीकरण..

लातूर, प्रतिनिधी आपत्कालीन परिस्थितीत विविध शासकीय विभागांमधील समन्वय आणि तत्परता तपासण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडच्या वतीने लातूर येथे ‘सीएनजी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन’ विषयावर भव्य संयुक्त प्रात्यक्षिकाचे (मॉक ड्रील) आयोजन करण्यात आले होते. संभाव्य गॅस गळती आणि आग दुर्घटनेच्या वेळी आपत्कालीन यंत्रणा कशा प्रकारे कार्य करतात, याचे यशस्वी सादरीकरण यावेळी करण्यात आले.

या रंगीत तालमीमध्ये एका सीएनजी वाहनाला गॅस गळतीमुळे आग लागल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी प्राथमिक स्तरावर आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महानगरपालिका अग्निशमन दल आणि पोलीस वाहतूक शाखा या यंत्रणांना त्वरित पाचारण करण्यात आले.

घटनेनंतर काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीची वैद्यकीय मदत देऊन रुग्णालयात हलविणे, वाहतूक पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करणे आणि अग्निशमन जवानांनी शिस्तबद्ध पद्धतीने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे, अशा टप्प्यांत ही मोहीम राबवण्यात आली. यातून विविध विभागांमधील अचूक समन्वय आणि जलद प्रतिसाद प्रणाली दिसून आली.

या उपक्रमास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, महापालिका अग्निशमन अधिकारी बापूसाहेब जाधव, आनंद शिंदे, तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी अतुल डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपविभागातर्फे डॉ. प्रमोद पाटील यांनी या संपूर्ण प्रक्रियेचे सूक्ष्म निरीक्षण केले. महानगर गॅसचे लातूर व धाराशिव जिल्हा प्रमुख राकेश तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद शितोळे, समीर संकपाळ, पल्लव भुते, अक्षय कुचेकर आणि संतोष हल्लाळे यांनी या रंगीत तालमीच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

****

संबंधित पोस्ट

स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’**10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर**महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारला सन्मान**यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे*

vishwatmaklokswamivarta

मिरज तालुक्यातील सरपंचपद आरक्षण कार्यक्रम बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे 15 जुलैला

खते, बियाणे, कीटकनाशकांची तपासणी करा-अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई कर     – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्याचा औद्योगिक आढावा-औद्योगिक परिसंस्था विकसीत करा- उद्योगमंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

पोषण भी पढ़ाई भी” प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

चिकू फळपिकविमा नोंदणीसाठीशेवटच्या पाच दिवसांची मुदत..