vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

२५ वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता १.५ कि.मी.पर्यंत खुला

२५ वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता १.५ कि.मी.पर्यंत खुला

 

नांदेड, प्रतिनिधी: नांदेड तालुक्यातील सुगाव बुद्रुक, सुगाव खुर्द ते भानपूर या मार्गावरील शिवरस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाले होते. संबंधित शेतकऱ्यांना रस्त्याचे महत्त्व समजावून सांगून त्यांच्या सहमतीने आज 22 मे 2026 रोजी सुमारे १.५ कि.मी. लांबीचा रस्ता खुला करण्यात आला.मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तालुक्यात शिवरस्ते व पाणंद रस्ते मोकळे करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

या कारवाईवेळी नायब तहसीलदार (महसूल) सुनिल माचेवाड, मंडळ अधिकारी नाळेश्वर, कुणाल जगताप, तलाठी सज्जा वाघी राजेश बरोडा तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी उपस्थित होते.यापुढेही अशाच प्रकारचे शिवरस्ते खुले करण्यात येणार असल्याचे तहसीलदार संजय वारकड यांनी सांगितले. तसेच रस्ते अडविणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे शासकीय लाभांपासून वंचित ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिलापावसाळ्यात शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना चिखलातून जावे लागत होते. आता रस्ता मोकळा झाल्याने शेतकऱ्यांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला.

यावेळी दत्ता भोसले, बाबुराव शिंदे, नामदेव शिंदे, दत्तराव तातेराव भोसले, विजय भोसले, गंगाधर भोसले, संतोष भोसले, जळबाजी भोसले आदी शेतकरी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी नागरिकांना कालमर्यादेत सेवा द्यावी  – उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीत ३५ हजार ९३२ प्रकरणे निकाली; सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड-जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात संपन्न

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा संपन्न..

भिम पदयात्रेद्वारे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

चंद्रपूर जिल्ह्यात कोळंबी पालन व्यवसायाला चालना देणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

कायदा सुव्यवस्थेसोबतच विकास कार्यातही पोलीसपाटलांनी योगदान द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी