vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर दैनंदिन 10 टक्के कपात…

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर दैनंदिन 10 टक्के कपात…

ठाणे प्रतिनिधी: बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने 15 मे 2026 पासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका हद्दीतील ज्या ज्या भागात पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणी 10 टक्के पाणी कपातीची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. तसेच सर्व नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याबाबत व पाण्याची बचत करण्याबाबत विविध उपाययोजनासंबंधी सूचना देऊन नियोजनपूर्वक पाणीपुरवठा करावा अशा सूचना बृहन्मुंबई महापालिकेने ठाणे महापालिकेस दिल्या आहेत.

 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती निहाय खालील परिसरात पाणीपुरवठा करण्यात येतो.नौपाडा-कोपरी प्रभाग समिती : हाजुरी, लुईसवाडी, नामदेववाडी, आनंदनगर, गावदेवी जलकुंभ, टेंभी बंगला जलकुंभ, कोपरी धोबीघाट, कन्हैया नगर जलकुंभ, कोपरी, नौपाडा, पाचपाखाडी.लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती : साईनाथ नगर, रामचंद्र नगर, जिजामाता नगर, ज्ञानेश्वर नगर, करवाळो नगर, इंदिरानगर.वागळे प्रभाग समिती : किसननगर १ व २, शिवाजीनगर, पडवळनगर, भटवाडी, अंबिका नगर.माजीवाडा-मानपाडा प्रभाग समिती : बाळकुम पाडा १ व २, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, गांधीनगर.या परिसरात दैनंदिन 10 टक्के पाणी कपात पुढील आदेश प्राप्त होईपर्यत लागू राहणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहेजलाशयांतील पाणीसाठा अधिकाधिक काळासाठी उपयोगात यावा या दृष्टीने खबरदारीचा उपाय तसेच भारतीय हवामान मान्सून विभागाने यंदा एल-निनो (El Niño) आणि आयओडी (IOD) परिस्थितीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ही उपाययोजना करण्यात येत आहे .

022-25364779आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101 ठाणे महानगरपालिका

संबंधित पोस्ट

दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्ड विशेष मोहीम राबवणार

ऐतिहासिक चवदार तळे सुशोभीकरणाचे २० मार्चला भूमिपूजन – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

नागरिकांच्या शारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी 21 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावे- जिल्हाधिकारी संतोष पाटील

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे सांगलीत २८ मार्चपासून तीन दिवसीय प्रदर्शन

मुख्यमंत्री कृती कार्यक्रमांतर्गत आदिवासी भागात सौरऊर्जेचा प्रभावी उपयोग — जिल्हाधिकारी किशन जावळे

जगभरात सुरू असलेल्या विविध संघर्षांवर भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही नेहमीच शांतता आणि स्थैर्याचे आवाहन- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी