vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

पुणे प्रतिनिधी

इलेक्ट्रिक वाहनाच्या वापरामुळे सुमारे ११ हजार लिटर डिझेलची दैनंदिन बचत -विभाग नियत्रंक अरुण सिया,माहे मे २०२६ पासून पेट्रोल, डिझेल व सीएनजी इंधनामध्ये झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने आगार पातळीवर डिझेल बचतीसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. विभागात १०५ इलेक्ट्रिक वाहने असून दैनंदिन ४६ हजार २३२ किलोमीटर चालनात येतात, त्यामुळे जवळपास १० हजार ९८१ लिटर डिझेलची दैनंदिन बचत होत आहे. येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर पूर्णक्षमतेने करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती विभाग नियत्रंक अरुण सिया यांनी दिली आहे.

 

पुणे विभागातील आगारांना आगार पातळीवर उद्दिष्टे निश्चित करुन देण्यात आलेली आहे. प्रत्येक आगाराने मागील वर्षाच्या तुलनेत १ ने किलोमीटर प्रति १० लिटरमध्ये (केपीटीएल) वाढ करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या फेऱ्यांचे उत्पन्न कमी झालेले आहेत त्या फेऱ्या तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आल्या आहेत. विभाग किंवा आगार पातळीवर चालकांच्या केपीटीएलमध्ये वाढ होण्याकरीता त्यांना प्रबोधन करण्यात येत आहे तसेच वरिष्ठ पातळीवरुन मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती श्री. सिया यांनी दिली आहे.

0000

संबंधित पोस्ट

ठाणे येथे 35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा, 2025 चेदि.22 फेब्रुवारी ते दि.1 मार्च 2025 या कालावधीत आयोजन..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मनुष्यबळाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे राज्य निवडणूक आयोगाने केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

मागास भागातील समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने एटापल्ली तालुक्यात बाएफ संस्थेमार्फत कार्यान्वित प्रकल्पामुळे रोजगार संधीत वाढ, समुदाय कल्याण पूरक उपक्रमात स्थानिकांचा सक्रिय सहभाग..

पुणे महानगर क्षेत्रात २२० प्रकल्पांची कामे; ३२ हजार ५२३ कोटींचा निधी मंजूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे महानगर नियोजन समितीची पाचवी सभा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर* 

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क;लसीकरण मोहिमेला वेग -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस