vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

रेल्वे स्टेशन चौक परिसरातील अज्ञात मृत व्यक्तीच्या वारसांचा शोध; ओळख पटविण्यासाठी आवाहन

रेल्वे स्टेशन चौक परिसरातील अज्ञात मृत व्यक्तीच्या वारसांचा शोध; ओळख पटविण्यासाठी आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-रेल्वे स्टेशन चौक आऊट गेट सिग्नल येथील रोड डिव्हायडरवर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी या अज्ञात मृत व्यक्तीच्या वारसांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ मे २०२६ रोजी रेल्वे स्टेशन चौक परिसरातील रोड डिव्हायडरवर वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे असलेला एक इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याला तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. या मृत व्यक्तीचे वर्णन मध्ये वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे.उंची अंदाजे ५ फूट. रंग काळा-सावळा.

 चेहरा लांबट गोल, नाक सरळ, डोळे काळे, डोक्यावर टक्कल आहे.अंगावरील कपडे: निळ्या रंगाचे जॅकेट आणि राखाडी (ग्रे) रंगाची पँट.या वर्णनाच्या व्यक्तीबाबत किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने वेदांत नगर पोलीस ठाणे किंवा सहायक फौजदार एन. डी. गुजर (मोबाईल क्र. ९९२३२४९७९२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबईतील वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील अँटॉप हिल पोलिसांनी मटका जुगारावर कारवाई – सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

vishwatmaklokswamivarta

भिवंडी येथील  २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई -दरोडे टाकणाऱ्या बदाम गॅंग च्या सात आरोपींना अटक

यावेळी कट इतका मोठा होता धोकादायक षड्यंत्र_पर्दापाश. …..

vishwatmaklokswamivarta

मुंबई पोलिसांच्या विशेष मोहिमेत चोरीचे आणि हरवलेले 213 मोबाईल जप्त  आणि या मोबाईल धारक मालकांना परत करण्यातआले आहेत