vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

 

राज्य प्रतिनिधी-जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या वतीने जिल्हाभर वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, वनवृक्ष बियाणे प्रदर्शन, सीड बॉल निर्मिती तसेच “एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

🌳 यानिमित्त मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तथा मा. वनसंरक्षक, नाशिक वनवृत्त श्री. गजेंद्र हिरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी निवास परिसरातील “सजिरी उद्यान” येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती अपर्णा पाटील तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विविध शाळांमधील इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, शिक्षक, महिला बचत गट सदस्य आणि नागरिकांना वृक्षांचे महत्त्व, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

🌿 नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, शहादा आणि तळोदा क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायत परिसर, शाळा, अंगणवाडी केंद्र, न्यायालय परिसर, रोपवाटिका तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.

🌾 यासोबतच सिसम, कांचन, आवळा, अंजन, कुसुम, बेहडा, बेल, खैर, बाभूळ, मोहगणी आणि महारुख यांसारख्या विविध वनवृक्षांच्या बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. अक्कलकुवा येथे बेहडा बियाण्यांपासून सीड बॉल निर्मिती उपक्रम राबवून भविष्यातील हरित संवर्धनासाठी प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले

 

संबंधित पोस्ट

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहार चौकशीसाठी विशेष चौकशी पथक- पणन मंत्री जयकुमार रावल

महिलांचा कायदा व प्रशासनावर विश्वास वाढविणे महत्वाचे; अशा उपक्रमांमुळे महिलांना न्याय मिळण्यास मोठी मदत होईल – विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई येथे 28 प्रकरणांवर सुनावणी पूर्ण

माहिती उपसंचालक रवी गीते यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ कोकण भवनात उत्साहात पार पडला

मुंबईतील कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंड प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीसाठी समिती गठीत करणार- मंत्री उदय सामंतउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार

ग्रंथांच्या यादीसंदर्भात सूचना, हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदवण्याचे आवाहन

समाजसेवेच्या आदर्शांचा गौरव – अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंतीनिमित्त जनजागृती उपक्रम-समाजसेवेच्या आदर्शांची आठवण, अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे