vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम  पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे..

मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम  पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे..

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. राज्यात ‘मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम’ आता युद्धपातळीवर व मोहीम स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. राज्यातील पशुधनाचे आरोग्य राखणे व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे हे आपले मुख्य ध्येय असून, निश्चित केलेल्या लक्ष्यांकित उद्दिष्टांच्या शंभर टक्के पूर्तीसाठी विभागाने काटेकोर नियोजन केले असून या मोहिमेत सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या घटसर्प (Haemorrhagic Septicaemia) व फऱ्या (Black Quarter) यांसारख्या घातक आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीची गुणवत्ता टिकून राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. लसीचा प्रभाव उत्तम राहण्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवण्यात आले आहे. राज्यस्तरापासून ते थेट ग्रामीण भागातील उपकेंद्रांपर्यंत लस पोहोचवताना आवश्यक तापमान राखले जाईल, यासाठी अद्ययावत कोल्ड बॉक्सचा वापर केला जात आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी विभागामार्फत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्हा व तालुका पातळीवर आवश्यकतेनुसार लसींचा पुरेसा साठा आधीच वितरित करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली असून, ती प्रत्यक्ष गावागावांत व गोठ्यांपर्यंत पोहोचून ‘डोअर स्टेप’ पद्धतीने लस टोचणी करत आहेत. एकाही जनावराचे लसीकरण सुटणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

पावसाळ्यात जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ऐनवेळी येणारे संकट आणि होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पशुपालकांनी आपल्या गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांचे मान्सूनपूर्व लसीकरण करून घ्यावे. यासाठी आपल्या जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही पशुसंवर्धन आयुक्त डॉ.किरण पाटील सांगितले आहे.

‘भारत पशुधन प्रणाली’वर तात्काळ नोंदणी

यावेळच्या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लसीकरणाचे पारदर्शक डिजिटल ट्रॅकिंग होय. आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, प्रत्येक पशुधनाला लस टोचल्यानंतर त्याची नोंद ‘भारत पशुधन प्रणाली’ (NDLM Portal) या केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर रिअल-टाइम (तात्काळ) करणे आवश्यक आहे. पशुधनाचे टॅगिंग (12 अंकी बिल्ला) करूनच ही नोंदणी केली जावी, जेणेकरून मोहिमेच्या प्रगतीवर थेट देखरेख ठेवता येईल व बोगस नोंदींना आळा बसेल

0000000

संबंधित पोस्ट

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर चित्रनगरीत विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण.

सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काममुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखलकरणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

30 वर्षापेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षकांचे प्रशिक्षण निवडणूक आयोगाकडून १,४४४ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय बाजार समित्यांचे सक्षमीकरण करताना शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे – उपमुख्यमंत्री अजित पवार