vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जलसंधारण कामावरील बांबू बेटाची केली पाहणी*

*जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जलसंधारण कामावरील बांबू बेटाची केली पाहणी*

 

नांदेड प्रतिनिधी- जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी लोहा येथील शेतकरी बालाजी कोटगीरे यांच्या शेतावर जलसंधारण कामांतर्गत विकसित करण्यात आलेल्या बांबू बेटाची पाहणी केली.

शेतकरी बालाजी कोटगीरे यांनी सन २०२३ मध्ये उन्हाळ्यात त्यांच्या शेतातील नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण केले. या नाल्याची लांबी ५०० फूट, खोली ५ फूट आणि रुंदी ८ फूट आहे. नाल्यातील गाळ व माती दोन्ही बाजूस टाकण्यात आली होती. मात्र पावसाळ्यात ही माती पुन्हा वाहून नाल्यात जाण्याची शक्यता होती.

या समस्येवर उपाय म्हणून श्री. कोटगीरे यांनी नाल्याच्या बांधावर ५×५ फूट अंतरावर बांबू लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २५ नोव्हेंबर २०२३ रोजी आलोव्हेरी जातीच्या बांबू रोपांची लागवड केली.

#बांबू लागवडीपूर्वी रोपांना आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी ठिबक सिंचन व्यवस्था उभारण्यात आली. रोपांची नियमित काळजी व गरजेनुसार पाणी दिल्यामुळे बांबूची वाढ झपाट्याने झाली.सध्या अवघ्या तीन वर्षांत प्रत्येक बांबू बेटामध्ये १५ ते २० काठ्यांची वाढ झाली असून बांबूची जाडी २ ते २.५ इंच आणि उंची २० ते २५ फूट इतकी झाली आहे.

या प्रयोगामुळे मागील काही वर्षांत:* बांध खचला नाही किंवा फुटला नाही* मातीची धूप झाली नाही* नाल्याचे पाणी शेतात आले नाही* शेतातील सुपीक माती वाहून गेली नाही* बांधावर गवत व अनावश्यक झुडपे वाढली नाहीतयामुळे जलसंधारणाचा उद्देश साध्य होण्याबरोबरच बांधावर दीर्घकालीन उत्पन्न देणारे पीक उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांनी अंदाज व्यक्त केला की १५० बांबू रोपांमधून पुढील काळात दरवर्षी सुमारे १५०० बांबू काठ्या उत्पादन मिळू शकते. प्रति काठी अंदाजे ४० रुपये दराने सुमारे ६० हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळण्याची क्षमता आहे. बांबू लागवडीच्या ५ वर्षांनंतर हे उत्पन्न पुढील ५० ते ८० वर्षे टिकाऊ स्वरूपात मिळू शकते.जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी संपूर्ण बांबू बेटाची पाहणी करून या उपक्रमाची माहिती घेतली.

०००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यावतीने आयोजित ५५६ पुनर्वसन झालेल्याबीडीडी चाळीच्या सदनिकांचे #चावी वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित

vishwatmaklokswamivarta

बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभेत भाजपाचा विजय ,जालन्यात भाजपाचा फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला; ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल

vishwatmaklokswamivarta

बांधकाम कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्रबाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करा-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे निर्देश

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त उपक्रम- परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

vishwatmaklokswamivarta