vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाण्यात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजराआमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

ठाण्यात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजराआमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

 

     ठाणे, प्रतिनिधी: भारतीय संस्कृतीची ५००० वर्षांची प्राचीन आणि अमूल्य देणगी असलेला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ आज २१ जून रोजी ठाण्यात अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात संपन्न झाला. महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाणेकरांनी आरोग्याचा नवा संकल्प सोडत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात आले.

     या योग दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम ठाणे (कोपरी) येथील तालुका क्रीडा संकुलात सकाळी ठीक ७.०० वाजता पार पडला. जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने पतंजली योग समिती, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि इतर नामांकित योग संस्थांच्या सहकार्याने या भव्य योग शिबिराचे आयोजन केले होते.

      या दिमाखदार सोहळ्याला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा दादू पाटील, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के या मान्यवरांसह दाक्षम जिमनॅस्टिक अकादमी, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, अश्वमेध वेटलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू व त्यांचे पालक, प्रशिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमादरम्यान श्रीमती रंजना तिवारी, पतंजली योग समिती तसेच श्री. विजय मढेकर, ठाणे स्कूल ऑफ योगा यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष मंत्रालयाने निर्धारित केलेल्या Common Yoga Protocol नुसार विविध योगासने, प्राणायाम व ध्यान सत्राचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्त्व, निरोगी व तणावरहित जीवनशैलीसाठी नियमित योगाभ्यासाची आवश्यकता तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य संवर्धनामध्ये योगाचे योगदान याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

   याप्रसंगी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांनी योग मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान साधनेचा सराव केला. स्वतः आमदार डावखरे आणि जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या सोबतीने योगाभ्यास करत आरोग्याचा संदेश दिला.

     या मुख्य सोहळ्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, औद्योगिक प्रतिष्ठाने, क्रीडा व युवक मंडळे तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात योग जनजागृती अभियान राबविण्यात आले.

       उपस्थितांनी नियमित योगाभ्यास करण्याचा तसेच निरोगी व सुदृढ जीवनशैलीचा संदेश समाजामध्ये प्रसारित करण्याचा संकल्प केला.

     कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांनी विविध योग संस्था, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने यशस्वीरित्या केले.

     जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणेकरांनी दाखवलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आजचा योग दिन सोहळा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला.

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय “अस्मिता लीग” क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न! 🏃‍♀️🏅

दिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्य16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्रीदिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री..

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनाऑनलाईन नोंदणीसाठी 31 डिसेंबरची मुदत 

vishwatmaklokswamivarta

अभिलेख वर्गीकरण करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा परिषद; शनिवार, रविवारी सुरू राहणार कामकाज

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी नियोजनभवनात संवादसातत्यपूर्ण संवादासाठी जिल्हा प्रशासनाचा उपक्रम,प्रत्येक अडचण सोडवून योजनांचा लाभ मिळवून देणारजिल्हाधिकारी वर्षा मीना

vishwatmaklokswamivarta

पदवीधर मतदारांच्या संख्येत वाढ होणार – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी नागपूर पदवीधर मतदार संघासाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; एका महिन्यात १ लाख ७ हजार मतदारांची नोंद

vishwatmaklokswamivarta