vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कंत्राटी स्वरुपात मानसोपचार तज्ञ पदाकरिता इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

कंत्राटी स्वरुपात मानसोपचार तज्ञ पदाकरिता इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

रायगड-अलिबाग,:- जिल्ह्यामध्ये विविध पोलीस ठाणेंचे हद्दीत भिन्न-भिन्न समाजाचे नागरीक राहत असून त्यांच्या सणवार व विविध धार्मिक कार्य वेळोवेळी करीत असतात. त्यामध्ये मिरवणूका यांचा देखील समावेश असून अशा वेळी पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलीस दलाची महत्वाची भुमिका आहे. विविध प्रकारची न्यायालयीन प्रकरणे, कुटुंबापासुन दुर राहून करावे लागणारे कर्तव्य व अन्य प्रासंगिक कारणास्तव पोलीस विभागातील पुरुष व महिला अधिकारी नेहमी ताण-तणावाखाली दडपणाखाली वावरत असतात. अशा परिस्थितीत त्यांचे मनोबल/मनोर्धर्य वाढविण्यासाठी 11 महिन्यांचे करारावर कंत्राटी स्वरुपात “मानसोपचार तज्ञ” नियुक्ती करावयाचे असून या पदासाठी इच्छुकांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन कार्यालय अधीक्षक श्रीमती वनिता मोरे यांनी केले आहे.
रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस अधीक्षक कार्यालय प्रशासकीय इमारत, पोलीस मुख्यालय, 08 उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, 30 पोलीस ठाणे, दुरक्षेत्र व पोलीस चौक्या कायान्वित आहेत. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी यांच्यात उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस उप-अधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या एकूण 201 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये पुरुष व महिला पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. तसेच पोलीस अंमलदार यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
पोलीस दलामध्ये जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कार्यक्षम पोलीस यंत्रणा असणे फार महत्वाचे आहे. रायगड जिल्हा हा दुर्गम व डोंगराळ भागात विखुरलेला असून जिल्हयाचे कार्यक्षेत्र माथेरान पासून पोलादपूर पर्यंत पोहोचलेले आहे. या जिल्हयाला लागून ठाणे, रत्नागिरी, पुणे, नवी मुंबई अशा जिल्ह्यांच्या सिमा असून जिल्हयातील भौगोलिक कार्यक्षेत्र खुप विस्तीर्ण आहे. त्यामुळे शहरीकरण मोठ्या प्रमाणात वेगाने वाढत आहे. त्यामुळे परप्रांतीय व अन्य देशातील नागरीक देखील जिल्ह्यात मोठ्या संख्येने येत आहेत.

 

000000

संबंधित पोस्ट

हिवताप / डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबईत सर्व विभागांमध्ये जनजागृती शिबीरे

तिरळेपणा निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवारी आयोजन*

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान कार्डसाठी ३१ ऑगस्ट अंतिम मुदत

vishwatmaklokswamivarta

रूग्णालयातील स्टोअरमधून औषध खरेदीची सक्ती नको‘एफडीए’चा इशारा

एचएमपीव्ही विषाणूसंदर्भात नागरिकांनी भीती बाळगू नये; काळजी घ्यावी- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सर्व अधिष्ठातांनी सतर्क राहण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

जिल्हा रुग्णालयात सोमवारी कान, नाक व घसा तज्ज्ञाव्दारे तपासणी; 18 वर्षाखालील बालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन